अखेर विशेष शाळांच्या सातव्या वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:30 IST2021-04-23T04:30:17+5:302021-04-23T04:30:17+5:30
चिमूर : सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या विशेष शाळांमधील शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाचा प्रश्न. आमदार कपिल पाटील आणि ...

अखेर विशेष शाळांच्या सातव्या वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी
चिमूर : सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या विशेष शाळांमधील शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाचा प्रश्न. आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीच्या पाठपुराव्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी त्यासंदर्भातल्या फाइलवर सही केल्याने मार्गी लागला आहे, अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली आहे.
केंद्र आणि राज्य सरकारच्या जवळपास सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू झाला; पण सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या विशेष शाळांमधील शिक्षक, कर्मचाऱ्यांना मात्र तो लागू झाला नव्हता. त्याबाबत आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारती यांच्या वतीने वारंवार निवेदन, बैठका घेऊन याबाबतची मागणी रेटून धरली होती. मागच्या अधिवेशनात आमदार कपिल पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी सातवा वेतन लागू करण्याबाबत आश्वासन दिले होते. आज अखेर त्यांनी आपला शब्द पाळला आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून सातव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विशेष शाळांमधील शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे, अशी माहिती शिक्षक भारती विशेष शाळा युनिटचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष महेश भगत, उपाध्यक्ष विजय भासारकर, सचिव रामदास कामडी, कार्याध्यक्ष पद्माकर मोरे, सहसचिव सुहास देवळे, कालिदास बलकी, कोषाध्यक्ष गिरिधर मसराम, सहकोषाध्यक्ष प्रमोद सातपुते, सहकार्याध्यक्ष गिरिधर तागडे आदींनी दिली आहे.