अखेर ‘त्या’ शाळेला शिक्षक मिळाला

By Admin | Updated: July 22, 2015 01:40 IST2015-07-22T01:40:38+5:302015-07-22T01:40:38+5:30

राजुरा तालुक्यातील गोवरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गेल्या एक वर्षांपासून शिक्षक नसल्याने चिमूकल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू होता.

Finally, he got a teacher from the school | अखेर ‘त्या’ शाळेला शिक्षक मिळाला

अखेर ‘त्या’ शाळेला शिक्षक मिळाला

गावकऱ्यांत समाधान : एक वर्षापासून सुरु होती मागणी
दणका लोकमतचा
गोवरी: राजुरा तालुक्यातील गोवरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गेल्या एक वर्षांपासून शिक्षक नसल्याने चिमूकल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू होता. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली. शिक्षक शोधण्यासाठी धावाधाव करुन अखेर गोवरी शाळेला शिक्षक दिल्याने विद्यार्थ्यांसह पालकांना दिलासा मिळाला आहे.
प्राथमिक शिक्षणापासून कोणताही बालक वंचित राहू नये, यासाठी शासनाकडून अनेक योजना राबविण्यात येऊन शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जातात. मात्र राजुरा पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या गोवरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एका शिक्षकाचे पद गेल्या एका वर्षापासून न भरल्याने दोन वर्गातील विद्यार्थ्यांना एकाच खोलीत बसवून शिक्षणाचे धडे गिरवावे लागत होते. त्यामुळे शिक्षकांना नेमक्या कोणत्या वर्गाचे शिक्षण विद्यार्थ्यांना द्यायचे असा पेच निर्माण झाला होता. यासाठी शिक्षकांना मोठी कसरत करावी लागत होती.
शाळेतील शिक्षकाचे रिक्त पद भरण्यात यावे, यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामदास देवाळकर, प्रभाकर इटनकर, प्रवीण टोगे, प्रभाकर जुनघरी, सतिश वडस्कर, ज्ञानेश्वर वडस्कर, विठ्ठल दरेकर व गावकऱ्यांनी शिक्षण विभागाला अनेकदा निवेदन दिले. मात्र गावकऱ्यांच्या या मागणीकडे संबंधीत विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे प्राथमिक शिक्षणाचा विद्यार्थ्यांचा पाया मजबूत होण्याऐवजी ढासळत चालला होता.
अनेकदा मागणी करुनही शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी शाळेला शिक्षक देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. याबाबत लोकमतने गुरुवारी वृत्त प्रकाशित करताच उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) फटींग, गटशिक्षणाधिकारी चव्हाण व केंद्र प्रमुख एस कातकर यांनी तातडीने गोवरी येथील जि.प. शाळेला भेट दिली. शाळेला शिक्षक देण्याचा आदेश काढून शाळेत संबंधीत शिक्षकाला रुजू होण्याचे आदेश दिल्याने शाळेला शिक्षक मिळाल्याने दिलासा मिळाला आहे. (वार्ताहर)

Web Title: Finally, he got a teacher from the school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.