अखेर नगरपरिषदेने लावली चार सिंह असलेली राजमुद्रा

By Admin | Updated: August 15, 2016 00:36 IST2016-08-15T00:36:34+5:302016-08-15T00:36:34+5:30

नगर परिषद मूल जवळील असलेल्या बाजार चौकात लावण्यात आलेल्या विजय स्तंभावर भारताच्या राजमुद्रेची प्रतिकृती लावण्यात आली.

Finally, the four lion-sized monkeys planted by the municipal council | अखेर नगरपरिषदेने लावली चार सिंह असलेली राजमुद्रा

अखेर नगरपरिषदेने लावली चार सिंह असलेली राजमुद्रा

तीन वर्षापासून मागणी : नगरसेवक प्रशांत समर्थ यांच्या प्रयत्नाला यश
मूल : नगर परिषद मूल जवळील असलेल्या बाजार चौकात लावण्यात आलेल्या विजय स्तंभावर भारताच्या राजमुद्रेची प्रतिकृती लावण्यात आली. त्या स्तंभावर चार सिंह असलेली प्रतिकृती लावणे आवश्यक होती. मात्र यापूर्वी तीन सिंह असलेली प्रतिकृती लावण्यात आल्याने न.प. मूलचे नगरसेवक प्रशांत समर्थ त्यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन चार सिंह असलेली प्रतिकृती लावण्याची मागणी केली. तब्बल तीन वर्षांनंतर न.प. प्रशासनाने चार सिंह असलेली राजमुद्रा लावली. त्यामुळे नगरसेवक प्रशांत समर्थ व इतर नगरसेवकांच्या प्रयत्नाला यश प्राप्त झाले आहे.
भारताची राजमुद्रा ही सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या आधारे तयार केलेली आहे. सारनाथ येथील मुळ स्तंभावर चार सिंह आहेत. मात्र समोरून बघीतल्यानंतर तीनच सिंह दिसतात. याबाबत शालेय अभ्यासक्रमात देखील राजमुद्रेविषयी माहिती दिली गेली आहे. राजमुद्रा एका कोपऱ्यात किंवा बाजुला ठेवली तर त्याचे तिनच भाग दिसतील, मात्र चौकात लावल्यास चारही सिंह दिसणे आवश्यक आहे. याबाबतचे लेखी निवेदन नगरसेवक प्रशांत समर्थ यांनी मुख्याधिकारी यांचेकडे १३ आॅगस्ट २०१३ ला दिले. त्या निवेदनात राजमुद्रा बदलविण्याची मागणी केली होती.
नुकतेच नव्याचे नियुक्त झालेले मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी याबाबत दखल घेतली. त्यानूसार सारनाथ येथील अशोकस्तंभावरील असणाऱ्या राजमुद्रेप्रमाणे चार बाजु असलेली सिंहाची प्रतिकृती लावण्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे १४ आॅगस्ट २०१६ च्या रात्री ही राजमुद्रा विजय स्तंभावर लावण्यात आली.
नगरसेवक प्रशांत समर्थ यांच्या समवेत महेश हरडे, मोती टहलियानी, विजय चिमड्यालवार, प्रशांत लाडवे, बाब अझीम, मंगला बोरकुटे, रिना थेरकर, प्रतिभा हरडे या नगरसेवकांनी राजमुद्रा लावण्यासाठी प्रयत्न केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Finally, the four lion-sized monkeys planted by the municipal council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.