‘तिचा’ अखेरचा क्षणही ठरला विद्यादानाचा !
By Admin | Updated: July 31, 2015 01:23 IST2015-07-31T01:23:57+5:302015-07-31T01:23:57+5:30
मृत्यू हे अटळ सत्य आहे. जन्माला आलेल्या प्रत्येकाला मृत्यूला सामोरे जावेच लागते. पण कर्तव्यावर असताना आलेला मृत्यू प्रत्येकाच्या नशिबी नसतो.

‘तिचा’ अखेरचा क्षणही ठरला विद्यादानाचा !
अंगणवाडीसेविकेचा मृत्यू : मांगली येथील घटना
नागभीड : मृत्यू हे अटळ सत्य आहे. जन्माला आलेल्या प्रत्येकाला मृत्यूला सामोरे जावेच लागते. पण कर्तव्यावर असताना आलेला मृत्यू प्रत्येकाच्या नशिबी नसतो. ते भाग्य फार थोड्याच्या नशिबी असते. मांगली येथील सईबाई देशमुख अश्याच नसिबवंतापैकी एक. त्या माऊलीला काळाने असे गाठले की, तिच्या मृत्यूचा कोणालाही हेवा वाटावा.
नागभीडपासून सात किमी अंतरावर मांगली दीड हजार लोकसंख्येचे गाव आहे. या गावात सईबाई बालकदास देशमुख ह्या अंगणवाडी शिक्षिका म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. आपण भले आणि आपले काम भले, या वृत्तीचे त्यांचे काम. नेहमीप्रमाणे त्या गुरूवारी आपल्या कर्तव्यावर गेल्या. तत्पुर्वी घरचे जे काही कर्तव्य असते, ते सर्वांशी हसत खेळत पार पाडले.
अंगणवाडीत पोहचल्यानंतर अंगणवाडीचे जे काही शिरस्ते असतात ते पूर्ण केले आणि नेहमीप्रमाणे अध्यापनाला सुरुवात केली. त्यांचे हे अध्यापन सुरु असताना त्यांना अचानक घरी आली आणि त्या खुर्चीवरुन खाली पडल्या. काय झाले हे कोणालाही क्षणभर कळलेच नाही. जवळच असलेल्या अंगणवाडी मतदनिसने प्रसंगावधान राखून शेजारच्यांना माहिती दिली. शेजारीही धावत आले. पण तोपर्यंत साराच खेळ संपला होता. (तालुका प्रतिनिधी)