आत्महत्या व अपघात रोखण्यासाठी निरुपयोगी विहिरी बुजवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:18 IST2021-07-08T04:18:56+5:302021-07-08T04:18:56+5:30

घरोघरी नळ, सार्वजनिक कूपनलिका, खासगी बोअरवेल असल्यामुळे गावातील बऱ्याच विहिरी निरुपयोगी झाल्या आहेत. मोजक्या चार-पाच विहिरीच उपयोगात आहे. काही ...

Fill useless wells to prevent suicide and accidents | आत्महत्या व अपघात रोखण्यासाठी निरुपयोगी विहिरी बुजवा

आत्महत्या व अपघात रोखण्यासाठी निरुपयोगी विहिरी बुजवा

घरोघरी नळ, सार्वजनिक कूपनलिका, खासगी बोअरवेल असल्यामुळे गावातील बऱ्याच विहिरी निरुपयोगी झाल्या आहेत. मोजक्या चार-पाच विहिरीच उपयोगात आहे. काही विहिरींवर लोकांनी अतिक्रमण केले आहे, तर काहींचा लोक कचरा टाकण्यासाठी उपयोगात आणत आहे. यामुळे दुर्गंधी व आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. तसेच गावातील अशा सार्वजनिक विहिरींवर कोणतेच आच्छादन म्हणजे जाळ्या नसल्याने गुरे-ढोरे पडण्याच्या घटनाही घडत आहेत. गंभीर बाब म्हणजे, अशा विहिरींचा उपयोग आत्महत्या करण्यासाठीही होत आहे. यावर आळा बसावा, यासाठी अशा विहिरी बुजवाव्यात. ज्यांचा उपयोग होत आहे त्या स्वच्छ कराव्यात, अशी मागणी काँग्रेस युवा कमिटीने विसापूर ग्रामपंचायतीकडे निवेदनातून केली आहे. शिष्टमंडळात प्रितम पाटणकर, उमंग जुनघरे, अंशुल रणदिवे, गोवील खुणे, संदेश उमरे, साहिल टोमटे, अनुदीप शेडमके, रोहित साखरे, सुमित गिरडकर, प्रशिक चुनारकर व देवांद्र उके उपस्थित होते.

070721\img-20210706-wa0080.jpg

गावातील सार्वजनिक विहिरीला जाळ्या लावावे.

विसापूर : गावातील सार्वजनिक विहिरीला जाळ्या लावण्यात यावे याकरिता युवक काँग्रेसने विसापूर ग्रामपंचायतीला निवेदन दिले.

घरोगरी नळ सार्वजनिक कुंपनलिका,खाजगी बोरिंग यामुळे गावातील बऱ्याच विहिरी निरुपयोगी झाल्या आहेत.मोजक्या चारपाच विहिरी उपयोगात आहे. काही विहरीवर लोकांनी अतिक्रमण केले आहे तर काही मध्ये लोक अक्षरशः कचरा टाकण्यासाठी उपयोगात आणत आहे यामुळे दुर्गंधी व आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत तसेच गावातील अशा सार्वजनिक विहिरीवर कोणतेच आच्छादन म्हणजे जाळ्या नसल्याने गुरे-ढोरे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही शिवाय अशा विहरीचा उपयोग आत्महत्या करण्यासाठी होत आहे. यावर आळा बसला पाहिजे ज्या विहरी निरुपयोगी आहेत त्या बुजवल्या पाहिजे ज्यांचा उपयोग होत आहे त्या स्वच्छ केल्या पाहिजे,या बाबत काँग्रेस युवा कमिटी ने विसापूर ग्रामपंचायतीला निवेदन दिले त्यावेळी प्रितम पाटणकर, उमंग जुनघरे,अंशुल रणदिवे, गोवील खुणे, संदेश उमरे,साहिल टोमटे अनुदीप शेडमके, रोहित साखरे, सुमित गिरडकर,प्रशिक चुनारकर, व देवांद्र उके उपस्थित होते.

Web Title: Fill useless wells to prevent suicide and accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.