तरुणांचे जत्थे दाखल

By Admin | Updated: January 6, 2015 22:57 IST2015-01-06T22:57:33+5:302015-01-06T22:57:33+5:30

येथील जिल्हा क्रीडा संकुलामध्ये सैन्य भरती प्रक्रिया राबविली जात आहे. मंगळवारी वर्धा जिल्ह्यासाठी राबविण्यात आलेल्या प्रक्रियेमध्ये १ हजार ५०० युवकांनी हजेरी लावली. सैन्यामध्ये भरती

Filing of youth groups | तरुणांचे जत्थे दाखल

तरुणांचे जत्थे दाखल

सैन्य भरती : पहिल्या दिवशी वर्धा जिल्ह्याचा राऊंड
चंद्रपूर : येथील जिल्हा क्रीडा संकुलामध्ये सैन्य भरती प्रक्रिया राबविली जात आहे. मंगळवारी वर्धा जिल्ह्यासाठी राबविण्यात आलेल्या प्रक्रियेमध्ये १ हजार ५०० युवकांनी हजेरी लावली. सैन्यामध्ये भरती होण्यासाठी युवकांमधील उत्साह वाखान्याजोगा होता.
यासाठी सोमवारपासून युवक चंद्रपुरात दाखल झाले. रेल्वे स्टेशन, बस स्थानकावर युवकांची गर्दी बघायला मिळाली. पहाटे ३ वाजेपासून कागपत्र तपासणी करण्यात आली. या प्रक्रियेमध्ये १ हजार ५०० युवकांनी हजेरी लावली असली तरी यातील ७५० युवक विविध कारणांसाठी बाद झाले. तर ७०० च्या वर युवकांची दौडसाठी निवड करण्यात आली. यात २५० जणांची निवड झाली. आता या युवकांची मेडिकल चाचणी होणार आहे. त्यानंतर पुढील सोपस्कार पार पाडले जाणार असल्याची माहिती कर्नल एम.के. जोशी यांनी दिली.

Web Title: Filing of youth groups