महाऔष्णिक केंद्राविरूद्ध गुन्हे दाखल

By Admin | Updated: August 19, 2016 01:50 IST2016-08-19T01:50:37+5:302016-08-19T01:50:37+5:30

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातून इरई नदी रसायनयुक्त पाणी सोडल्याने प्रदूषण झाले होते.

Filed under Criminal Code | महाऔष्णिक केंद्राविरूद्ध गुन्हे दाखल

महाऔष्णिक केंद्राविरूद्ध गुन्हे दाखल

इरईचे प्रदूषण : पर्यावरणवाद्यांची तक्रार
चंद्रपूर : चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातून इरई नदी रसायनयुक्त पाणी सोडल्याने प्रदूषण झाले होते. याप्रकरणी पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी चंद्रपूर महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या प्रशासनाविरोधात दुर्गापूर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
चंद्रपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तुकूम परिसरातील जलशुद्धीकरण केंद्रातील हौदात मोठ्या प्रमाणावर लाल रंगाचे पाणी बुधवारी सकाळी जमा झाले. पर्यावरणवाद्यांना कुंदन प्लाझा हॉटेलजवळून वाहणाऱ्या नाल्यातून हे लाल रंगाचे पाणी येवून इरई नदीच्या प्रवाहात मिसळत असल्याचे दिसले. याबाबत ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे, प्रा. योगेश दुधपचारे, सचिन वझलवार, इको-प्रो संघटनेचे बंडू धोतरे यांनी चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणली.
पर्यावरणवाद्यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, पोलीस अधिक्षक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे तक्रारी केल्या. (प्रतिनिधी)

दुर्गापूर पोलिसांनी नोंदविले गुन्हे
चंद्रपूर महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्रातून पाणी सोडण्यात आल्याने इरई नदीचे पाणी प्रदूषित झाले. त्याबाबत ग्रीन प्लॅनेटने दुर्गापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावरून निर्मिती कंपनीच्या प्रशासनाविरोधात भादंवि कलम ३३३, मुंबई कायद्याअंतर्गत कलम १०८, ११७ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Web Title: Filed under Criminal Code

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.