नांदगावच्या बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:29 AM2021-05-18T04:29:24+5:302021-05-18T04:29:24+5:30

कारवाई करताना नायब तहसीलदार पवार, संवर्ग विकास अधिकारी कडसे, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. सुमेध खोब्रागडे दवाखाना केला सील मूल: ...

Filed a case against a bogus doctor from Nandgaon | नांदगावच्या बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल

नांदगावच्या बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल

Next

कारवाई करताना नायब तहसीलदार पवार, संवर्ग विकास अधिकारी कडसे, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. सुमेध खोब्रागडे

दवाखाना केला सील

मूल: मागील आठ वर्षांपासून कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र जवळ नसताना खासगी दवाखाना सुरू करून रुग्णांवर उपचार करणाऱ्या देवकुमार तारापद बुधक या बोगस डाॅक्टरवर मूल पोलीस स्टेशन येथे शनिवारी गुन्हा दाखल केला आहे.

मूल तालुक्यातील नांदगाव येथे वैद्यकीय व्यवसायाची कोणतीही पदवी नसताना देवकुमार तारापद बुधक या बोगस डाॅक्टराने मागील अनेक वर्षांपासून नांदगाव येथे एका भाड्याच्या खोलीत दवाखाना सुरू केला आहे. दरम्यान, नायब तहसीलदार यशवंत पवार, संवर्ग विकास अधिकारी डाॅ. मयूर कडसे आणि डाॅ. सुमेध खोब्रागडे यांनी आपल्या पथकासह नांदगाव येथे जावून देवकुमार बुधक यांच्या दवाखान्याची चौकशी केली असता, तांटिया विद्यापीठ श्री गंगानगर राजस्थान येथे बीएचएमएसच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत असल्याची माहिती देवकुमार बुधक यांनी पथकाला दिली. पदवी नसतानाही त्यांनी वैद्यकीय व्यवसाय सुरू केल्याचे निदर्शनात आले. यावेळी दवाखान्याची झडती घेतली असता, औषध आणि रुग्णांवर उपचार करणारे साहित्य मिळाल्याने ते जप्त केले व दवाखान्याला सील करण्यात आले.

येथील तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. सुमेध खोब्रागडे यांच्या तक्रारीवरून मूल पोलीस स्टेशन येथे कलम ४१९, २७६ भादंविसह महाराष्ट्र वैद्यक व्यवसायी अधिनियम २००० कलम ३३ (१), ३३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Filed a case against a bogus doctor from Nandgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.