संविधानाच्या प्रास्ताविकेत बदल करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 00:07 IST2017-12-16T00:06:45+5:302017-12-16T00:07:32+5:30

भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेत बदल करणाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तालुक्यातील विविध संघटनांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे़ याबाबत राष्ट्रपतींना निवेदन पाठविले आहे.

File an offense against those who make changes in the constitutional provisions | संविधानाच्या प्रास्ताविकेत बदल करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करा

संविधानाच्या प्रास्ताविकेत बदल करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करा

ठळक मुद्देएसडीओंना निवेदन : विविध सामाजिक मंडळाची मागणी

आॅनलाईन लोकमत
ब्रह्मपुरी : भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेत बदल करणाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तालुक्यातील विविध संघटनांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे़ याबाबत राष्ट्रपतींना निवेदन पाठविले आहे.
निवेदनात म्हटले, की भारतीय संविधानातील प्रास्ताविकात बदल करण्याचा कुणालाही अधिकार नाही़ मात्र, काही मंडेळी विशिष्ट विचारांचा प्रचार करण्यासाठी जाहिरातींच्या माध्यमातून संविधानातील प्रास्ताविकेत बदल केले़ हा प्रकार पूर्णत: संविधानविरोधी आहे़ त्यामुळे दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी संघटनांनी केली आहे़ निवेदन देताना दी बुद्धिस्ट एम्प्लाईज अ‍ॅन्ड नॉन एम्प्लाईज सोशल असोसिएशन तालुका ओबीसी संघटना धम्मप्रचार केंद्र, त्रिरत्न बौद्ध विहार समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच, युवा जनकल्याण संस्था, मागासवर्गीय आदिम कृती समिती, मुस्लीम संघटना, फुले-शाहू-आंबेडकर विचार संवर्धन समिती, महात्मा महिला मंडळ, बौद्ध समाज महिला मंडळ, श्री संत रविदास चर्मकार बहुउद्देशीय मंडळ, सम्राट अशोक बौद्ध समाज कुर्झा, प्रज्ञा विहार बौद्ध समाज बोंडेगाव, प्रज्ञा महिला मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते़

Web Title: File an offense against those who make changes in the constitutional provisions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.