घुग्घूस नगर परिषद निर्मितीची फाईल नगर विकास विभागाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:28 IST2020-12-31T04:28:40+5:302020-12-31T04:28:40+5:30

चंद्रपूर : घुग्घूस नगर परिषदेच्या निर्मिती फाईलवर सोमवारी रात्री उशिरा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वाक्षरी केली. त्यानंतर नियमानूसार ...

File of Ghughhus Municipal Council formation to the Urban Development Department | घुग्घूस नगर परिषद निर्मितीची फाईल नगर विकास विभागाकडे

घुग्घूस नगर परिषद निर्मितीची फाईल नगर विकास विभागाकडे

चंद्रपूर : घुग्घूस नगर परिषदेच्या निर्मिती फाईलवर सोमवारी रात्री उशिरा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वाक्षरी केली. त्यानंतर नियमानूसार सर्व प्रक्रिया पूर्ण करुन ही फाईलवर विधी- न्याय विभागने अभिप्राय नोंदवून फाईल पुन्हा ग्रामविकास विभागाकडे वळती करण्यात आली, अशी माहिती आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली.

घूग्घुस नगर परिषदेच्या निर्मितीसाठी येथील सर्वपक्ष एकजूट झाले आहे. यासाठी आंदोलने सुरु आहेत. नागरिकांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकला. कुणीही उमेदवारी अर्ज दाखल केले नाही. सातत्याच्या पाठपूरावा केल्यानंतर घुग्घूस नगर परिषद निर्मितीच्या हालचालींना वेग आला. पालकमंत्री विजय वडेट्टीवार हेही यासाठी आग्रही असून त्यांचाही सातत्याने पाठपूरावा सुरु आहे. रात्री उशीरा आ. जोरगेवार यांच्या प्रत्येक्ष ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी या फाईलवर स्वाक्षरी केली. त्यानतंर फाईल ग्रामविकास विभागाकडून विधी - न्याय विभागाकडे पाठविण्यात आली. विधी व न्याय विभागाने फाईलवर योग्य कार्यवाही करत आपले अभिप्राय नोंदवून पून्हा ती फाईल ग्रामविकास विभागाकडे वळती केली. आता औपचारीकता पूर्ण करुन ही फाईल ग्रामविकास विभाग अंतिम मान्यतेसाठी नगर विकास विभागाकडे पाठविणार आहे. येत्या एक ते दोन दिवसात हि प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे, अशी माहिती आमदार जोरगेवार दिली.

Web Title: File of Ghughhus Municipal Council formation to the Urban Development Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.