विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:29 IST2021-09-25T04:29:41+5:302021-09-25T04:29:41+5:30

चंद्रपूर : पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या २३० व्या जयंतीनिमित्य आयोजित एका कार्यक्रमात विधान परिषदेचे विरोधी ...

File a case against Praveen Darekar, Leader of Opposition in the Legislative Council | विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा

विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा

चंद्रपूर : पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या २३० व्या जयंतीनिमित्य आयोजित एका कार्यक्रमात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे, असे वक्तव्य केले होते. याविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्ष बेबी उईके यांनी पोलीस निरीक्षक मधुकर गिते यांच्याकडे रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महिला वर्गाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. महिलांच्या विनयशीलतेचा अवमान झाला आहे, तसेच अशा वक्तव्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला धोका पोहोचवून दोन गटांमध्ये तेढ निर्माण केली आहे. या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी पक्षाच्या जनमानसातील प्रतिमेला मलिन व बदनाम केले आहे. यामुळे प्रवीण दरेकर यांनी केलेले वक्तव्य हा दखलपात्र गुन्हा असून, त्यांच्याविरुद्ध कलम १५३ बी, ५०० व ५०९ प्रमाणे गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष बेबी उईके यांनी केलेल्या तक्रारीतून केली आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष वंदना आवळे, सरस्वती गावंडे आदींची उपस्थिती होती.

Web Title: File a case against Praveen Darekar, Leader of Opposition in the Legislative Council