मटण विक्रीवरून हाणामारी, दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:30 IST2021-09-27T04:30:45+5:302021-09-27T04:30:45+5:30

या हाणामारीत माजी नगरसेवक विलास जंगळुजी तुम्हाने (४५) व तनीष गजानन दुर्गे (१६) हे जखमी झाले असून, दोघांनाही ...

Fighting over meat sales, both injured | मटण विक्रीवरून हाणामारी, दोघे जखमी

मटण विक्रीवरून हाणामारी, दोघे जखमी

या हाणामारीत माजी नगरसेवक विलास जंगळुजी तुम्हाने (४५) व तनीष गजानन दुर्गे (१६) हे जखमी झाले असून, दोघांनाही चंद्रपूर येथील जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तनीष दुर्गे याचे मटणाचे दुकान रामपूर येथे बाजार समितीसमोर आहे. माजी नगरसेवक विलास तुम्हाने यांचा दुर्गेसोबत मटण विक्रीवरून वाद झाला. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास दुर्गे याच्या दुकानात जाऊन तुम्हाने यांनी पुन्हा वाद घातला. यावेळी विलास तुम्हाने यांनी तनीषला मारहाण केली. त्यात तनीष जखमी झाला. मात्र जवळच असलेल्या तनीषचा भाऊ जतीन याने आपल्या भावाला मारले म्हणून विलास तुम्हाने यांच्यावर सत्तूरने वार केला. यात विलास तुम्हाने हे गंभीर जखमी झाले असून, दोन्ही जखमींना चंद्रपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. पुढील तपास राजुरा पोलीस करत आहेत. हे वृत्त लिहीपर्यंत कुणावरही गुन्हा दाखल झाला नव्हता.

Web Title: Fighting over meat sales, both injured