सावरगाव येथे दोन गटांत हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:33 IST2021-01-16T04:33:14+5:302021-01-16T04:33:14+5:30
सावरगाव येथे नेहमीच दोन गटांत निवडणूक लढविली जाते. त्यामुळे सदर निवडणुकीत दोन्ही गटांत तणावाचे वातावरण असते. यावेळी अपक्ष उमेदवारही ...

सावरगाव येथे दोन गटांत हाणामारी
सावरगाव येथे नेहमीच दोन गटांत निवडणूक लढविली जाते. त्यामुळे सदर निवडणुकीत दोन्ही गटांत तणावाचे वातावरण असते. यावेळी अपक्ष उमेदवारही नशीब आजमावून पाहणार असले तरी खरी लढत ही दोन्ही गटांतच होणार आहे. हे दोन्ही गट काँग्रेस व भाजपप्रणित आहेत. दरम्यान वाॅर्ड नं. ३ मधील एका आजारी वृद्धेला तीन मुले असूनसुद्धा तिऱ्हाईत व्यक्तीने दुचाकीवर मतदान केंद्रात आणले. या विषयावरून दोन गटांत हाणामारी झाली. वेळीच पोलिसांना पाचारण करण्यात आले. परिस्थिती पूर्वपदावर येताच दुपारी पुन्हा दोन गटांत जोरदार भांडण झाले. त्यानंतर मात्र तळोधी पोलिसांच्या निगराणीतच मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.