१६ ग्रामपंचायतीसाठी १०६ जागांवर लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:23 IST2021-01-09T04:23:54+5:302021-01-09T04:23:54+5:30
कोरपना : तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीत या टप्प्यात निवडणुका होऊ घातलेल्या आहे. यातील शेरज खू ग्रामपंचायत आधीच अविरोध झाल्याने आता ...

१६ ग्रामपंचायतीसाठी १०६ जागांवर लढत
कोरपना : तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीत या टप्प्यात निवडणुका होऊ घातलेल्या आहे. यातील शेरज खू ग्रामपंचायत आधीच अविरोध झाल्याने आता १६ ठिकाणीच खरी लढत पाहायला मिळणार आहे.
या संपूर्ण निवडणुकीत १३३ जागांसाठी निवडणूक होणार होती. यातील भोयगाव, भारोसा, पिपरी, आवारपूर, वनोजा, कोडशी खु., नोकारी येथे प्रत्येकी एक, गाडेगाव, शेरज बुद्रुक, तलोधी, कडोलीत दोन, सांगोडा पाच जागा तर शेरज खु. येथील सातही सदस्य अविरोध निवड झाल्याने २७ जागेवर निवडणूक होणार नाही. यातील १३३ जागेवरच निवडणूक होणार आहे. यासाठी गावा- गावात काँग्रेस, भाजपा, शेतकरी संघटना, गोंडवाना गणतंत्र पार्टी, मनसे, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना, आदी पक्षांनी आपले उमेदवार उभे केले आहे. बऱ्याच ग्रामपंचायतीत अभद्र युतीही बघावयास मिळत आहे. त्यामुळे गावात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तालुक्यातील निवडणुका शांततेत पार पडण्यासाठी प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन कोरपनाचे तहसीलदार महेंद्र वाकलेकर, ठाणेदार अरूण गुरनुले, गडचांदूरचे ठाणेदार गोपाल भारती यांनी केले आहे.