गोठ्याला भीषण आग, दोन गार्इंसह बैलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 05:00 AM2020-08-05T05:00:00+5:302020-08-05T05:00:21+5:30

पाचगाव येथील गोविंदा मडावी यांचा गावालगत जनावरांचा गोठा आहे. पावसाच्या दिवसात गोठ्या सभोवताल किडे व डासांचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून शेतकºयाने आगीचे धुपाटणे केले होते. तेवढ्यातच पाऊस सुरू झाल्याने मडावी यांनी लगबगीने जनावरे गोठ्यात बांधून घराकडे गेले. जेवण करून सर्व गावकरी झोपेत असतानाच गोठ्याला अचानक आग लागली. आगीच्या ज्वाळा पाहून आग गावकऱ्यांनी आग विझविण्यासाठी गोठ्याकडे धाव घेतली.

Fierce fire at the barn, death of a bull with two garrisons | गोठ्याला भीषण आग, दोन गार्इंसह बैलाचा मृत्यू

गोठ्याला भीषण आग, दोन गार्इंसह बैलाचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देपाचगाव येथील घटना : आगीच्या धुपाटण्याने केला घात

लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : राजुरा तालुक्यातील पाचगाव येथील (मडावी गुडा) येथे शेतकरी गोविंदा मडावी यांच्या गोठ्याला सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याने दोन गायींसह एक बैल व काही कोंबड्यांचा होरपळून मृत्यू झाला. या भीषण आगीत शेतीची अवजारे खत, औषधी जळून खाक ऐन खरीप हंगामात शेतकऱ्यावर संकट कोसळले आहे. या घटनेत सुमारे तीन लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
पाचगाव येथील गोविंदा मडावी यांचा गावालगत जनावरांचा गोठा आहे. पावसाच्या दिवसात गोठ्या सभोवताल किडे व डासांचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून शेतकऱ्याने आगीचे धुपाटणे केले होते. तेवढ्यातच पाऊस सुरू झाल्याने मडावी यांनी लगबगीने जनावरे गोठ्यात बांधून घराकडे गेले. जेवण करून सर्व गावकरी झोपेत असतानाच गोठ्याला अचानक आग लागली. आगीच्या ज्वाळा पाहून आग गावकऱ्यांनी आग विझविण्यासाठी गोठ्याकडे धाव घेतली. उपसरपंच गोपाल जंबुलवार यांनी राजुरा येथील अग्निशमन दलाला पाचारण केले. मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केल्याने दोन गायींसह एका बैल व काही कोंबड्या होरपळून ठार झाल्या. एक बैल आगीत भाजल्याने गंभीर जखमी झाला. गोठ्यातील कृषी अवजारे, खताच्या २० बॅग जळाल्या. शर्थीचे प्रयत्न करून अग्निशमन दलाने आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला. शेतकऱ्याच्या तक्रारीवरून तलाठी बापूजी गेडाम यांनी पंचनामा केला. शासनाने शेतकऱ्याला तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी पोलीस पाटील शंकर खामनकर उपसरपंच गोपाल जंबुलवार, रूपेश गेडेकर, रामा आळे, तिरूपती इंदूरवार आदींनी केली आहे.

गावकऱ्यांकडून मदतीचा हात
ऐन शेतीच्या हंगामात गोविंदा मडावी यांचे मोठे नुकसान झाले आहे. हाती पैसा नसल्याने हंगाम कसा करावा असा प्रश्न निर्माण झाला. मात्र, गावकऱ्यांनी दोन तासात १३ हजार ९१३ रूपयांची आर्थिक मदत केली. कृषी केंद्र संचालकांनी औषधी, खत व सरकारी धान्य दुकानदारांनी धान्य देवून माणुसकीचे दर्शन घडविले.

Web Title: Fierce fire at the barn, death of a bull with two garrisons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग