बाजारात जे विकते, शेतात तेच पिकवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 05:01 IST2020-02-10T05:00:00+5:302020-02-10T05:01:07+5:30

कुणबी समाज मंडळाच्या वतीने स्थानिक चांदा क्लब ग्राउंड येथे सुरु असलेल्या शेतकरी महोत्सव २०२० च्या मुख्य सत्राचे उदघाटन खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते शनिवारी झाले. यावेळी बळीराजा विशेषांक ई-बुकचे प्रकाशन खासदार धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

In the field, sell what is sold in the field | बाजारात जे विकते, शेतात तेच पिकवा

बाजारात जे विकते, शेतात तेच पिकवा

ठळक मुद्देबाळू धानोरकर : शेतकरी महोत्सव २०२०

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : बाजारात जे सहज विकल्या जाते, ज्या वस्तूची मागणी आहे, तीच वस्तू शेतात पिकवा. शेतीतून आकस्मिक होणारे नुकसान सोसण्यासाठी शेतीपुरक जोडधंदा करा. शासनाकडून मिळणाऱ्या सबसिडीचा व योजनांचा लाभ घ्या, असे प्रतिपादन खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांनी केले.
कुणबी समाज मंडळाच्या वतीने स्थानिक चांदा क्लब ग्राउंड येथे सुरु असलेल्या शेतकरी महोत्सव २०२० च्या मुख्य सत्राचे उदघाटन खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते शनिवारी झाले. यावेळी बळीराजा विशेषांक ई-बुकचे प्रकाशन खासदार धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
सावित्री-ज्योतीबा मंचावर यावेळी अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे होते. तर सत्कारमूर्ती चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड. वामनराव चटप, मनोहर पाऊणकर, अनिल धानोरकर, रमेश राजूरकर, दिनेश चोखारे, राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, बळीराज धोटे, डॉ. सुरेश महाकुलकर, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले, तात्यासाहेब मत्ते, अ‍ॅड. पुरुषोत्तम सातपुते, श्रीधरराव मालेकर आदी उपस्थित होते. यावेळी आमदार जोरगेवार, राजेंद्र वैद्य, अ‍ॅड. चटप यांचा सत्कार करण्यात आला.
अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे म्हणाले, या शेतकरी मेळाव्याने समाजात एक पायंडा घातला आहे. आता दरवर्षीच हा शेतकरी मेळावा व्हावा. सामान्य नागरिकांनी शेतकऱ्यांचा माल घेताना भावबाजी करु नये, असे ते म्हणाले.
अ‍ॅड. वामनराव चटप म्हणाले, शेतकऱ्यांना मारक कायदे रद्द करण्यात यावे. शेतकऱ्याचा माल जीवनावश्यक वस्तूंच्या कायद्यातून बाहेर काढला जावा. तरच शेतकऱ्यांच्या मालाचा भाव वाढेल.
सत्कारमूर्ती आमदार जोरगेवार म्हणाले, पुढील वर्षी शासनासोबत पब्लिक पार्टनर जॉइंट व्हेंचर करून या शेतकरी मेळाव्याचे आयोजन करू. शेतकऱ्यांसाठी जे-जे करता येईल ते करु, असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक अ‍ॅड. पुरुषोत्तम सातपुते यांनी केले. संचालन प्रा. रविकांत वरारकर तर आभार विनायक धोटे यांनी केले.

Web Title: In the field, sell what is sold in the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.