ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकासआघाडी मैदानात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:38 IST2020-12-30T04:38:46+5:302020-12-30T04:38:46+5:30
बल्लारपूर : राज्याप्रमाणे ग्रामपंचायत निवडणुकीतही महाविकास आघाडी कायम ठेवण्यासाठी बल्लारपूर तालुक्यातील काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या नेत्यांमध्ये एकमत ...

ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकासआघाडी मैदानात
बल्लारपूर : राज्याप्रमाणे ग्रामपंचायत निवडणुकीतही महाविकास आघाडी कायम ठेवण्यासाठी बल्लारपूर तालुक्यातील काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या नेत्यांमध्ये एकमत झाले असून महा आघाडीच्या वतीने अनेक उमेदवार ठरविण्यात आले आहे.
बल्लारपूर तालुक्यातील विसापूर, नांदगाव(पोडे), हडस्ती, पळसगाव, मानोरा, किन्हीं, गिलबिली, आमडी, कळमना आणि कोर्टी मत्ता या दहा ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. यातील काही ग्रामपंचायतींमध्ये भाजपा तर काहींमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. या तहसीलमधील ग्रामीण क्षेत्रात सत्तेत काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचा समान वाटा असावा याकरिता तिनही पक्ष एकजुटीने ग्रामपंचायत निवडणुकीत उतरत आहेत. याकरिता महावीकास आघाडीकडून बरेच या उमेदवारांची निवड करण्यात आली असून बाकीच्यांच्या निवडीवर विचार सुरू असल्याचे त्यांनी पक्षाच्या तालुक्यातील वरिष्ठ नेत्यांनी सांगितले..