ब्रह्मपुरी शहरात उत्सवाचे वातावरण
By Admin | Updated: April 14, 2016 01:18 IST2016-04-14T01:18:21+5:302016-04-14T01:18:21+5:30
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्ताने ब्रह्मपुरी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

ब्रह्मपुरी शहरात उत्सवाचे वातावरण
शहर सजले : बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम
ब्रह्मपुरी : विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्ताने ब्रह्मपुरी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पताका, होर्डिंग्ज, बॅनर आदीने शहरासह ग्रामीण भागात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ब्रह्मपुरी तालुका शांतताप्रिय तालुका म्हणून ओळख आहे. या तालुक्यात विचारांची चांगली देवाणघेवाण होत असल्याने एकमेकांच्या भावनेचा आदर प्रत्येकजण करताना दिसून येते. सध्या शहरात व ग्रामीण भागात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीच्या निमित्ताने शहर सजले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समिती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम आदीच्या माध्यमातून अनेक कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे. विविध ठिकाणी डिजे, ढोलताशांच्या गजरात मिरवणुकीसाठी जय्यत तयारी सुरू आहे तर अनेक ठिकाणी समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमाची मेजवानी शहरासह ग्रामीण भागाला मिळणार आहे. लाडू वितरण, सरबत वितरण अन्नदान आदी महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे मोठ्या धूमधडाक्यात आयोजन करण्यात आले आहे. गेली आठ दिवसापासून जयंतीच्या निमित्ताने प्रबोधनात्मक तथा संगीतमय कार्यक्रम सुरू आहेत. एकूणच बाबासाहेबांची जयंती उत्सवात पार पाडण्यासाठी शहरासह ग्रामीण भाग सजलेले दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)
१२५ किलोचा लाडू
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्ताने काँग्रेस कमिटीच्या वतीने जनसंपर्क कार्यालयासमोर १२५ किलो वजनाचा १२५ फूट लांबीचा केक १२५ विद्यार्थ्यांच्या हस्ते कापला जाणार आहे. आ. विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम होत असून याची तयारीही पूर्ण झाली आहे.