शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
12
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
13
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
15
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
16
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
17
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
18
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
19
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
20
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!

चंद्रपुरातून पुणे व मुंबईसाठी धावणार फेस्टिव्हल स्पेशल रेल्वे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 14:03 IST

Chandrapur : सामान्य प्रवाशी, विद्यार्थी व व्यावसायिकांची अडचण दूर

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : सणासुदीच्या दिवसात जिल्ह्याबाहेर वास्तव्य करणाऱ्या, शैक्षणिक कारणामुळे पुणे, मुंबई व इतरत्र शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच जिल्ह्यातून स्वगृही ये-जा करण्यासाठी रेल्वेची सुलभ सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी चंद्रपूर व बल्लारपुरातून फेस्टिव्हल स्पेशल गाड्या सुरू होणार आहेत, अशी माहिती माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी दिली.

दिवाळी व अन्य सणांच्या पार्श्वभूमीवर ट्रेन क्र. ०१४५१ पुणे करीमनगर २१ ऑक्टोबर २०२४ रोजी, तर ट्रेन क्र. ०१४५२ करीमनगर - पुणे २३ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रवाशांच्या सुविधेसाठी सोडण्यात येणार आहे. याबरोबरच ट्रेन क्र. ०७१९७ काजीपेठ - दादर (साप्ता.) १२ ऑक्टोबर २०२४ रोजी, तर ट्रेन क्र. ७१९८ दादर काजीपेठ १३ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रत्येक रविवारी प्रवाशांच्या सेवेत रुजू होत आहे. या विशेष गाड्यांमुळे चंद्रपूर यवतमाळ जिल्ह्यात येणाऱ्या व सणासुदीला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होईल. एसटी व खासगी बसेसमधून ये-जा करणाऱ्या प्रवाशांचा मानसिक व आर्थिक त्रास यामुळे कमी होणार आहे. प्रवाशांनी या विशेष रेल्वे गाड्यांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले. 

असे आहे रेल्वे गाड्यांचे वेळापत्रकट्रेन क्र. १४५१ पुणे - करीमनगर सोमवार, २१ ऑक्टोबर २०२४ रोजी पुणे येथून रात्री २२:४५ वाजता रवाना होईल. ही गाडी अहमदनगर २:०० वाजता, मनमाड ५:२०, औरंगाबाद ७:३५, जालना ८:३२, नांदेड १२:१५, आदिलाबाद १६:१०, चंद्रपूर २०:३७, बल्लारशाह २१:५०, करीमनगर येथे बुधवारी रात्री २:०० वाजता पोहोचेल. ट्रेन क्र. ०१४५२ करीमनगर - पुणे बुधवार, २३ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ६:०० वाजता रवाना होऊन बल्लारशाह येथे १०:१० वाजता पोहोचेल. चंद्रपूर १०:३०, आदिलाबाद १३:५५, नांदेड १७:३५, जालना २०:२२, औरंगाबाद २१:४५, मनमाड गुरुवारी पहाटे २:२५, अहमदनगर ६:०२, पुणे येथे ९:४५ वाजता पोहोचेल. या स्थानकांव्यतिरिक्त दौंड, परभणी, पूर्णा, पिंपळखुटी, किनवट, बोधादी, सहस्वाकुंड, हिमायतनगर, भौकर, मुदखेड, सेलू, परतूर, रोटेगाव, कोपरगाव, माजरी, शिरपूर कागजनगर, मंचेरियल, रामगुंडम व पेदापल्ली स्थानकांवर ही गाडी थांबणार आहे. ट्रेन क्र. ०७१९७ काजीपेठ - दादर (साप्ता.) ही शनिवार, १२ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११:३० वाजता रवाना होऊन बल्लारशाह येथे १६:०५ वाजता पोहोचेल. त्यानंतर चंद्रपूर १६:२५, भांदक १६:४५, वणी १७:२५, आदिलाबाद २१:३५, नांदेड १:४५, (रविवार) पोहोचणार आहे. 

टॅग्स :railwayरेल्वेchandrapur-acचंद्रपूर