लॉकडाऊन काळातील खत विक्रीचा द्यावा लागणार अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 05:00 IST2020-08-29T05:00:00+5:302020-08-29T05:00:47+5:30
केंद्रीय रसायन व खते मंत्रालयाने राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांना पत्र पाठवून जिल्ह्यातील खत विक्री संदर्भातील अहवाल मागविण्याच्या सूचना दिल्या. केंद्राने यापूर्वी अशा प्रकारचे पाऊल उचलेले नव्हते. यापूर्वी कृषी विभागाच्या गुणनियंत्रण निरीक्षकांकडून खत विक्रीबाबत चौकशी अहवाल मागविण्यात येत होता. मात्र,गुण नियंत्रणकांना वगळून अहवाल सादर करण्याच्या सूचना केंद्राने दिल्या.

लॉकडाऊन काळातील खत विक्रीचा द्यावा लागणार अहवाल
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लॉकडाऊन सुरू केले होते. या कालावधीत काही विक्रेत्यांनी गैरव्यहार केल्याची शंका आहे. त्यामुळे केंद्र सरकारने खत विक्रीची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे विक्रेत्यांना आता खत विक्रीचा अहवाल प्रशासनाला सादर करावा लागणार आहे.
केंद्रीय रसायन व खते मंत्रालयाने राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांना पत्र पाठवून जिल्ह्यातील खत विक्री संदर्भातील अहवाल मागविण्याच्या सूचना दिल्या. केंद्राने यापूर्वी अशा प्रकारचे पाऊल उचलेले नव्हते. यापूर्वी कृषी विभागाच्या गुणनियंत्रण निरीक्षकांकडून खत विक्रीबाबत चौकशी अहवाल मागविण्यात येत होता. मात्र,गुण नियंत्रणकांना वगळून अहवाल सादर करण्याच्या सूचना केंद्राने दिल्या. त्यानुसार जिल्ह्यातही अशा प्रकारचा अहवाल मागविण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासनाने सुरू केल्या आहेत. खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच प्रशासनाने १६२.३३६ मेट्रीक टन खताची मागणी नोंदवली होती. त्यानुसार १३३.११० मेट्रीक टन आवंठन मंजूर झाले.
लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी जिल्ह्यात २९.२४६ मेट्रीक टन साठा उपलब्ध होता. राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर लॉकडाऊन करण्यात आले. त्या कालावधीत खताचा गैरव्यहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यामुळे लॉकडाऊन कालावधीत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक खत विक्रीची चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. दोन प्रकारच्या प्रपत्रांमध्ये ही मागविण्यात आली आहे.
प्रत्यक्ष चौकशी करणे जिल्हाधिकाऱ्यांना शक्य नसल्यास दुसरा चौकशी अधिकारी हा अतिरिक्त जिल्हाधिकारी पदापेक्षा कमी दर्जाचा नसावा, असेही केंद्राने बजावले आहे. या आदेशानंतर आयुक्तालयाने आदेश जारी केले. १ एप्रिल ते ३१ जुलै या कालवधीत जिल्ह्यात सर्वात जास्त खते विकलेल्या २० नोंदीपुरतीच ही चौकशी मर्यादित असल्याची माहिती सूत्राने दिली.
विक्रेत्यांच्या समजून घ्याव्या समस्या
जिल्ह्यातील काही डिलर्सकडून एकाच शेतकऱ्याला जादा खत विकण्याची शक्यता असू शकते. मात्र, लॉकडाऊन काळात दुकाने नियमित उघडी नव्हती. त्यामुळे एकदा दुकाने उघडताच शेतकऱ्यांचा कल एकाच वेळ खते खरेदी करण्याकडे कल होता. पॉस मशीनवर नेमके किती खत विकावे, याबाबत स्पष्ट नियम नाही. त्यामुळे प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्यांच्या समस्या समजून घेण्याची गरज आहे. आदेशाचा धाक दाखवून विक्रेत्यांना त्रास देवू नये, अशी मागणी जिल्हा खत विक्री असोसिएशनने केली आहे.