स्त्री शक्ती ही सर्वश्रेष्ठ शक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:35 IST2021-02-05T07:35:55+5:302021-02-05T07:35:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोरपना : स्त्री ही विश्वाची जननी आहे. त्यामुळे स्त्रीशक्ती ही सर्वश्रेष्ठ मातृशक्ती आहे, असे मत राज्याचे ...

Female power is the greatest power | स्त्री शक्ती ही सर्वश्रेष्ठ शक्ती

स्त्री शक्ती ही सर्वश्रेष्ठ शक्ती

लोकमत न्यूज नेटवर्क

कोरपना : स्त्री ही विश्वाची जननी आहे. त्यामुळे स्त्रीशक्ती ही सर्वश्रेष्ठ मातृशक्ती आहे, असे मत राज्याचे माजी अर्थमंत्री व बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी कोरपना येथे भारतीय जनता पक्ष महिला आघाडीतर्फे आयोजित मकर संक्रांत उत्सव, महिला मेळावा व आत्मनिर्भर महिला संमेलन कार्यक्रमात व्यक्त केले.

यावेळी माजी आमदार संजय धोटे, सुदर्शन निमकर, भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव सोपान कर्णेकर, भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महिला जिल्हाध्यक्ष अल्का आत्राम, माजी महापौर अंजली घोटेकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, सतीश धोटे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण हिवरकर, जिल्हा सचिव विशाल गज्जलवार, नगरसेवक अरविंद डोहे, अमोल आसेकर, जिल्हा महामंत्री महेश देवकते, विवेक बोढे, नामदेव डाहुले, सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष किशोर बावणे, जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष आशिष ताजने, जिल्हा सचिव ओम पवार, रमेश मालेकार, जिल्हा महिला महामंत्री विजयालक्ष्मी डोहे, जिल्हा सचिव इंदिरा कोल्हे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सोनाली रणदिवे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अलका रणदिवे, जया धारणकर, कल्पना बावणे, शोभा आगलावे, वर्षा लांडगे, प्रियंका पानघाटे, सोनाली आसेकर, सविता तुमराम, गीता डोहे, संगीता चींतलवर, जोशना वैरागडे, सीमा मोहितकर, पूजा देरकर, सरोज घोटेकर, मनिषा मालेकर, लता दगडी, मीरा मोडक, वैशाली कवरासे, ममता लेंडांगे, सुरेखा मुके, वर्षा पिंपळकर, सुमन परचाके आदींनी सहकार्य केले.

Web Title: Female power is the greatest power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.