पर्यावरण जनजागृती सायकल रॅलीतील युवकांचा सत्कार
By Admin | Updated: February 11, 2017 00:41 IST2017-02-11T00:41:49+5:302017-02-11T00:41:49+5:30
सायकलने चंद्रपूर ते दिल्ली ते चंद्रपूर तब्बल २६०० ते २७०० किलोमीटर प्रवास करून बुधवारला परत आलेल्या ...

पर्यावरण जनजागृती सायकल रॅलीतील युवकांचा सत्कार
वाघ वाचवा जंगल वाचवा : संजीवनी संस्थेचा उपक्रम
चंद्रपूर : सायकलने चंद्रपूर ते दिल्ली ते चंद्रपूर तब्बल २६०० ते २७०० किलोमीटर प्रवास करून बुधवारला परत आलेल्या युवकांचा संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेच्या वतीने त्यांचे संस्थेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
सायकल चालक दर्शन झाडे व त्यांचे सहयोगी पवन खनके, कुणाल कामडी, सागर कातकर यांचे संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले, डॉ.गोपाल मुंधडा, नगरसेवक संजय वैद्य, पी.एन. धुमाळ, मोहन रायपूरे, गिरीश बेले, शैलेश जुमडे, देवानंद साखरकर, सुमीत ढोकपांडे, आशू बावणे, भूषण देशमुख, यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सायकल रॅलीदरम्यान जंगल, वन्यजीव, पर्यावरणाबद्दल प्रचार करून जनजागृती करण्यात आली. (नगर प्रतिनिधी)