सत्यशोधक समाजातर्फे धनश्री निखातेचा सत्कार

By Admin | Updated: June 3, 2016 00:52 IST2016-06-03T00:52:39+5:302016-06-03T00:52:39+5:30

नुकत्याच महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारा घोषित झालेल्या १२ वी विज्ञान शाखेत चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातून

Felicitation of Dhanashree Nikhate by Satyashodhak Samaj | सत्यशोधक समाजातर्फे धनश्री निखातेचा सत्कार

सत्यशोधक समाजातर्फे धनश्री निखातेचा सत्कार

चंद्रपूर: नुकत्याच महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारा घोषित झालेल्या १२ वी विज्ञान शाखेत चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान धनश्री सुभाष निखाते हिने मिळविला आहे. त्याबद्दल अखिल भारतीय सत्यशोधक समाज जिल्हा चंद्रपूरतर्फे तिचा हसत्कार करण्यात आला.
बारावीच्या परीक्षेत धनश्री निखाते हिने विज्ञान शाखेतून ९४.३० टक्के गुण मिळविले आहे. त्याबद्दल तिचा गुणगौरव करण्यात आला. अ.भा. सत्यशोधक समाजाचे कार्याध्यक्ष सूर्यभान झाडे, प्रा. माधव गुरनुले, अरुण धानोरकर, प्रा. एस. टी. चिकटे, एच. बी. पटले, यश निकोडे, पांडुरंग गावतुरे, अ‍ॅड. प्रशांत सोनुले यांनी पुष्पगुच्छ देवून तिचा सत्कार केला. (प्रतिनिधी)

Web Title: Felicitation of Dhanashree Nikhate by Satyashodhak Samaj