लोकमान्य महाविद्यालयात गुणवंतांचा सत्कार

By Admin | Updated: June 1, 2015 01:34 IST2015-06-01T01:34:45+5:302015-06-01T01:34:45+5:30

नुकत्याच जाहीर झालेल्या १२ वीच्या परीक्षेत लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालय भद्रावतीच्या विज्ञान शाखेचा ९८.५० तर कला शाखेचा ९२.५० टक्के निकाल लागला.

Felicitating Quality at Lokmanya College | लोकमान्य महाविद्यालयात गुणवंतांचा सत्कार

लोकमान्य महाविद्यालयात गुणवंतांचा सत्कार

भद्रावती : नुकत्याच जाहीर झालेल्या १२ वीच्या परीक्षेत लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालय भद्रावतीच्या विज्ञान शाखेचा ९८.५० तर कला शाखेचा ९२.५० टक्के निकाल लागला. यात ४४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्यांचा महाविद्यालयाच्या वतीने शुक्रवारी सत्कार करण्यात आला.
कला शाखेतील प्रगती बन्सोड (७४ टक्के), अश्विनी पारसे (६९ टक्के) व विशाल कळमकर (६८ टक्के) तसेच विज्ञान शाखेतून ओंकार दहीवलकर (८१ टक्के), वैभव तराळे (७४.४० टक्के) व नम्रता वाढई (७३.६९ टक्के) या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरविण्यात आले.
याप्रसंगी लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार, शाळा समिती अध्यक्ष विकास उपगन्लावार, सचिव मनोहर पारधे, सदस्य बळवंत ताठे, विठ्ठल पारधे, मधुकर नारळे, नामदेव कोल्हे, प्राचार्य विनोद पांढरे, उपप्राचार्या रेखा पबितवार, पर्यवेक्षक गोपाल ठेगणे, पर्यवेक्षक प्रा. चंद्रकांत देशपांडे, प्रा. सुरेश परसावार, प्रा. विलास कोटगिरवार, प्रा. सचिन सरपटवार, प्रा. आशिष आकोजवार, प्रा. प्रणिता शेंडे, प्रा. नितीन लांजेवार, प्रा. पंकज पांढरे व पालक वर्ग उपस्थित होते. लोकमान्य क.म. ची उत्कृष्ठ निकालाची परंपरा यंदाही कायम आहे. स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी अधिक समोर जावे व यश प्राप्त करावे, असे याप्रसंगी लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष म्हणाले. संचालन प्रा. नितीन लांजेवार यांनी केले.

Web Title: Felicitating Quality at Lokmanya College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.