प्रावीण्यप्राप्त प्रशिक्षणार्थ्यांचा सत्कार

By Admin | Updated: July 20, 2015 00:51 IST2015-07-20T00:51:23+5:302015-07-20T00:51:23+5:30

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर येथे १७ जुलैला प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

Felicitated proficient trainees | प्रावीण्यप्राप्त प्रशिक्षणार्थ्यांचा सत्कार

प्रावीण्यप्राप्त प्रशिक्षणार्थ्यांचा सत्कार

चंद्रपूर: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर येथे १७ जुलैला प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कौशल्यम सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा कोषागार अधिकारी एम.एस. वाघमारे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य नितीन जुनोनकर होते. आईस एनर्जी सर्व्हीसेसचे सहसंचालक अमरदिप शुक्ला, गटनिदेशक पी. पी, कटरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
केंद्र सरकारच्या स्किल डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड एंटरप्रिनरशिप मंत्रालयाच्या सूचनेप्रमाणे संस्थेत व्यवसाय प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना शिकाऊ उमेदवारी नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. तसेच राष्ट्रीय व्यवसाय प्रणापत्राचेही वितरण करण्यात आले. अखिल भारतीय कौशल्य स्पर्धेतील राज्यस्तरावर प्रथम आलेल्या आशिष मोगरे (कोपा) यांचा प्राचार्यतर्फे रोख पारितोषिक, गौरव चिन्ह व सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात आला. संस्थेतून उत्तीर्ण होवून राज्यातील विविध खाजगी तथा शासकीय आस्थापनात कुशल कारागीर म्हणून रुजू झालेल्या २३ यशस्वी उमेदवारांना प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. अ. भा. व्यवसाय परीक्षा जुलै २०१४ च्या परीक्षेत व्यवसायनिहाय प्रथम गुणाने उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्याचा या प्रसंगी गौरव करण्यात आला. नागपूर येथील खाजगी आस्थापनासाठी निवड झालेल्या तीन उमेदवारांना रोजगार नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले. स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्टाफक्लबच्या सहकार्याने कचरा संकलन पेट्याची निर्मिती करणारे सात प्रशिक्षणार्थी व चार कर्मचारी निदेशक तसेच विशेष निदेशक म्हणून शंकर मद्देलवार यांचाही प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन बी. आर. बोढेकर यांनी केले तर आभार पी. पी. कटरे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Felicitated proficient trainees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.