विजय बावणे यांचा नगरपंचायतीतर्फे सत्कार
By Admin | Updated: August 6, 2016 00:45 IST2016-08-06T00:45:53+5:302016-08-06T00:45:53+5:30
तालुक्याच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक चळवळीत विजय बावणे यांनी निरपेक्षवृत्तीने काम करून वेगवेगळ्या क्षेत्रातील माणसं जोडण्याचे काम केले.

विजय बावणे यांचा नगरपंचायतीतर्फे सत्कार
कोरपना : तालुक्याच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक चळवळीत विजय बावणे यांनी निरपेक्षवृत्तीने काम करून वेगवेगळ्या क्षेत्रातील माणसं जोडण्याचे काम केले. गरीबीची चटके सोसत माणूस म्हणून त्यांनी अनेकांना आधार दिला, असे मत जिल्हा परिषद सदस्य उत्तमराव पेचे यांनी केले.
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संस्थापक विजय बावणे यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. कोरपना नगर पंचायतच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर तर प्रमुख पाहुणे म्हणून विनोद दत्तात्रेय, अरुण धोटे, श्रीधरराव गोडे, नंदाताई बावणे, प्रभाकर गेडाम आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
विजय बावणे यांचे राजकीय व्यक्तीमहत्त्व असले तरी शेतात राबणारे ते प्रगतशील शेतकरी आहेत. तालुक्यातील जनतेच्या समस्या सोडवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे, असे कौतुकोउद्गार जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊनकर काढले.
विजय बावणे जिल्हा बँकेचे प्रथम संचालक बनले तेव्हा कोरपना तालुक्याच्या ठिकाणी बँकेच्या स्वत:च्या मालकीची मोठी इमारत उभी केली. महिला बचत गटांना रोजगार देण्याचे सतत कार्य केले, असे मान्यवरांनी यावेळी सांगितले. संचालन सचिन फुलझेले यांनी तर आभार फराण वहाब यांनी मानले.
एटीएमचा शुभारंभ
कोरपना येथे एटीएम नसल्याने शेतकरी व नोकर वर्गाला बँकेत तासन्तास उभे राहावे लागत होते. याची दखल घेत जिल्हा मध्यवर्ती बँकेची एटीएम सेवा येथे सुरू करण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी)