हवाई सफर विजेती संध्या राऊतचा सत्कार
By Admin | Updated: December 14, 2015 00:55 IST2015-12-14T00:55:44+5:302015-12-14T00:55:44+5:30
लोकमत द्वारा आयोजित ‘संस्काराचे मोती जरा हटके-२०१५’ स्पर्धेत जिल्ह्यातून प्रथम मानकरी ठरलेली ब्रह्मपुरी येथील नेवजाबाई हितकारिणी कन्या हायस्कूलची विद्यार्थिनी...

हवाई सफर विजेती संध्या राऊतचा सत्कार
ब्रह्मपुरी : लोकमत द्वारा आयोजित ‘संस्काराचे मोती जरा हटके-२०१५’ स्पर्धेत जिल्ह्यातून प्रथम मानकरी ठरलेली ब्रह्मपुरी येथील नेवजाबाई हितकारिणी कन्या हायस्कूलची विद्यार्थिनी संध्या सुधीर राऊत हिचा संस्थेचे सचिव अशोकभैय्या यांनी शाळेच्या खुल्या पटांगणावर हजारो विद्यार्थिनीसमोर शनिवारी सत्कार केला.
संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील पाच हजार प्रवेशिकामधून नागपूर कार्यालयात ड्रॉ काढला असता ब्रह्मपुरीच्या नेवजाबाई हितकारिणी कन्या हायस्कूलची वर्ग ८ वा (क) मधील विद्यार्थिनी संध्या सुधीर राऊत प्रथम विजेती ठरली. त्यामुळे शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव अशोक भैय्या होते. प्रा.विजय मुळे, उपप्राचार्य नेवलकर, पर्यवेक्षक मोहरकर व लोकमतचे तालुका प्रतिनिधी प्रा. डॉ.रवी रणदिवे मंचावर उपस्थित होते.
याप्रसंगी अशोक भैया यांनी लोकमतच्या उपक्रमाची प्रशंसा केली व ब्रह्मपुरीला हा बहुमान मिळाल्याने ‘लोकमत’चे आभार मानले. कार्यक्रमाचे संचालन राजू हटवार, आभार दलाल यांनी मानले. कार्यक्रमाला शिक्षक व विद्यार्थिनी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)