३ जानेवारीला मच्छिमार समाजाचा उपवर-वधू परिचय मेळावा
By Admin | Updated: December 25, 2015 00:36 IST2015-12-25T00:36:34+5:302015-12-25T00:36:34+5:30
चंद्रपूर जिल्हा भोई समाज सेवा संघ तथा अंतर्गत शाखांच्या संयुक्त विद्यमाने मच्छिमारांचा समाज प्रबोधन कार्यक्रम

३ जानेवारीला मच्छिमार समाजाचा उपवर-वधू परिचय मेळावा
माजरी: चंद्रपूर जिल्हा भोई समाज सेवा संघ तथा अंतर्गत शाखांच्या संयुक्त विद्यमाने मच्छिमारांचा समाज प्रबोधन कार्यक्रम आणि भोई समाजातील उपवर युवक-युवती विवाह इच्छूक विधवा, घटस्फोटीता व अपंग यांचा विदर्भस्तरिय परिचय मेळावा स्थानिक मूल मार्गावरील एकलव्य वसतिगृहात ३ जानेवारीला आयोजित करण्यात आला आहे.
चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त न्यायाधीश चंद्रलाल मेश्राम (पुणे) हे असणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून आ. नाना श्यामकुळे राष्ट्रीय मच्छीमार सेवा संघाचे अध्यक्ष प्रकाश लोणारे (नवी दिल्ली) उपस्थित राहणार आहे.
या कार्यक्रमादरम्यान समाजातील साहसी कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, विशेष पुरस्कार प्राप्त, पीएचडी प्राप्त व्यक्तींचा सत्कार करण्यात येणार आहे.
मेळाव्यादरम्यान, विवाह जुळलेल्यांसाठी विवाहाची मोफत व्यवस्था करण्यात आली असून भोई समाज बांधवांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, अशी विनंती संघाच्यावतीने करण्यात आली आहे.
सामूहिक विवाह सोहळ्याची शासकीय मदत मिळविण्यासाठी एकाचवेळी दहा विवाह होणे आवश्यक आहे. नियोजित वधू-वरांचे पहिलेच लग्न असल्याचा सरपंच किंवा न.प.चा दाखला, जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, रहवासी दाखला वर-वधूंचे दोन पासपोर्ट छायाचित्र, वराचे वय २१ वर्ष व वधूचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्याचा पुरावा स, टीसी आणि वर किंवा वधू यापैकी किमान एक व्यक्ती भोई ढीवर समाजातील असणे गरजेचे आहे. (वार्ताहर)