तापाच्या साथीने पंचाळा गावात भीतीचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:28 IST2021-04-27T04:28:52+5:302021-04-27T04:28:52+5:30
जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. ग्रामीण भागातही कोरोना संसर्गाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण असतानाच ...

तापाच्या साथीने पंचाळा गावात भीतीचे वातावरण
जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. ग्रामीण भागातही कोरोना संसर्गाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण असतानाच राजुरा तालुक्यातील पंचाळा येथे गेल्या १५ दिवसापासून मोठ्या प्रमाणात तापाची साथ सुरू आहे. नागरिक खाटेवर तापाने फणफणत असताना आरोग्य विभागाचे अधिकारी या गंभीर बाबीकडे लक्ष द्यायला तयार नाही. वातावरणात बदल होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. गावाजवळ चनाखा येथे आरोग्य उपकेंद्र आहे. परंतु पंचाळा येथे तापाची साथ सुरू असूनही आरोग्य विभाग लक्ष द्यायला तयार नसल्याचे दिसून येत आहे. तसेच पंचाळा येथे कोरोनाचा शिरकाव झाल्याने गावात पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे. आरोग्य विभागाने या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
बॉक्स
गावात आरोग्य तपासणी शिबिर लावावे
ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण असतानाच पंचाळा येथे गेल्या १५ दिवसापासून तापाची साथ सुरू आहे. परंतु आरोग्य विभागाने याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केल्यामुळे तापाच्या रुग्णात वाढ झाली आहे. त्यामुळे पंचाळा गावात आरोग्य तपासणी शिबिर लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.