‘त्या’ डबक्याने आरोग्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:27 IST2021-03-31T04:27:52+5:302021-03-31T04:27:52+5:30
चंद्रपूर : येथील शिलगंध बुद्धविहाराच्या समोरील मोकळ्या जागेवर पाण्याचे डबके तयार झाले असून मोठ्या प्रमाणात कचराही टाकण्यात येत आहे. ...

‘त्या’ डबक्याने आरोग्याची भीती
चंद्रपूर : येथील शिलगंध बुद्धविहाराच्या समोरील मोकळ्या जागेवर पाण्याचे डबके तयार झाले असून मोठ्या प्रमाणात कचराही टाकण्यात येत आहे. त्यामुळे डासांची निर्मीती होत असून परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे मनपाचे दुर्लक्ष होत आहे.येथील नगिनाबाग सिस्टर कॉलनी परिसरातील शिलगंध बुद्ध विहाराच्यासमोर मोठे मोकळे भूखंड आहे. परिसरातील बरेच कुटुंब या मोकळ्या भूखंडांवरच कचरा टाकतात. तसेच परिसरातील काही नागरिकांचे सांडपाणीसुद्धा याच जागेवर जाते. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात बेशरमची झाडे निर्माण झाली आहे. अनेकदा येथून दुर्गंधीसुद्धा सुटत असते. त्यामुळे हे केंद्राच डासांची उत्पत्ती करणारे ठिकाण बनले आहे. याबाबत परिसरातील नागरिकांनी अनेकदा मनपा प्रशासनाला सूचना केल्या. मात्र कुठल्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आली नाही.
शिलगंध विहारामध्ये अनेक बौद्ध बांधव वंदना करण्यासाठी जात असतात. तसेच या परिसरात सकाळ व सायंकाळच्या सुमारास हातठेले लागत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी राहत असते. त्यामुळे या डबक्यामुळे आरोग्याची समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. मात्र याकडे मनपाचे दुर्लक्ष होत आहे.