एफडीसीएमचे वनाधिकारी बनले वनसंपदेचे भक्षक ?

By Admin | Updated: March 14, 2016 00:57 IST2016-03-14T00:57:41+5:302016-03-14T00:57:41+5:30

मध्य चांदा वनविकास महामंडळांतर्गत येणाऱ्या गोंडपिंपरी तालुक्यातील चार महत्त्वपूर्ण वनपरिक्षेत्रात मागील महिन्यापासून अवैध बांबूतोड प्रकरणाला ऊत आला आहे.

FDCM's Forest Officer became a Forest Supplier? | एफडीसीएमचे वनाधिकारी बनले वनसंपदेचे भक्षक ?

एफडीसीएमचे वनाधिकारी बनले वनसंपदेचे भक्षक ?

अतिरिक्त कमाईची लालसा : वरिष्ठांचा जाणीवपूर्वक कानाडोळा
गोंडपिपरी : मध्य चांदा वनविकास महामंडळांतर्गत येणाऱ्या गोंडपिंपरी तालुक्यातील चार महत्त्वपूर्ण वनपरिक्षेत्रात मागील महिन्यापासून अवैध बांबूतोड प्रकरणाला ऊत आला आहे. एफडीसीएमच्याच वनाधिकाऱ्यांनी वनसंपदेचे नुकसान केल्याची सर्वत्र बोंब सुरू असताना वरिष्ठ मात्र या सर्व प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करित असल्याचे दिसून येते. त्यामुळे एफडीसीएमचे वनाधिकारीच बनले वनसंपदेचे भक्षक, अशी चर्चा गावकऱ्यांत सुरू आहे.
मागील महिन्यापासून एफडीसीएमच्या कन्हाळगाव, झरण, तोहोगाव, धाबा या चारही वनपरिक्षेत्रामध्ये तेजीने बांबू कटाईचे काम सुरू आहे. या कामासाठी चारही वनक्षेत्रात परप्रांतीय मजुरांचा वापर करून स्थानिकांना डावलण्यात आले. तसेच परराज्यातून आलेल्या कामगारांना तोकडे व अनियमित वेतन देण्याचा प्रकारही याच दरम्यान घडला आहे. त्यामुळे मजुरांवर उपासमारीची वेळही ओढावली होती. वनपरिक्षेत्रांतर्गत एफडीसीएम विभागाकडून परवानगी नसलेल्या कक्षांमध्ये बांबू कटाईचे काम करण्यात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी दाखविलेला अतिउत्साहीपणा हा केवळ अधिक माया कमविण्याचा आकस आहे. मात्र वरिष्ठ या गंभीर बाबीकडे कानाडोळा करीत असून अद्यापही कुठलीही कारवाई करण्याकरीता पुढे पावले उचलली नाही. त्यामुळे वनविकास महामंडळाच्या या ‘मिलीभगत’ प्रकाराची तालुक्यात सर्वत्र चर्चा रंगत आहे. निसर्गाची अनमोल देण असलेल्या वनसंपदेचे रक्षकच आता भक्षक म्हणून पुढे येऊ लागल्याने तालुक्यात चाललेल्या या प्रकारावर गांभीर्याने लक्ष देणार तरी कोण, असा सवाल येथील नागरिकांकडून विचारल्या जात आहे.
वनसंपदेने चौफेर नटलेल्या गोंडपिंपरी तालुक्यात आजवर घडलेल्या घटनांमध्ये वनक्षेत्राला आग लागून लाखोंचे नुकसान, वन्यप्राण्यांची कत्तल, वाघ मृत्यू प्रकरणे, लाकडांची तस्करी अशा घटनांमध्ये एफडीसीएमच्या अधिकाऱ्यांनी कधीही हिरीरी दाखविली नाही, अशी चर्चा सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: FDCM's Forest Officer became a Forest Supplier?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.