श्रावणातला उपवास महागला; शेंगदाणे, साबुदाणा किलोमागे पाच रुपयांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:32 IST2021-08-25T04:32:53+5:302021-08-25T04:32:53+5:30
चंद्रपूर : नुकतीच श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. श्रावण महिना व्रतवैकल्यांचा असल्याने अनेक जण उपवास करीत असतात. त्यामुळे उपवासाचे ...

श्रावणातला उपवास महागला; शेंगदाणे, साबुदाणा किलोमागे पाच रुपयांची वाढ
चंद्रपूर :
नुकतीच श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे.
श्रावण महिना व्रतवैकल्यांचा असल्याने अनेक जण उपवास करीत असतात. त्यामुळे उपवासाचे पदार्थ बनविण्यासाठी लागणाऱ्यांची वस्तूची मागणी असते. त्यामुळे शेंगदाणे, साबुदाणा, भगर आदींच्या दरामध्ये वाढ झाली आहे. परिणामी श्रावणातील उपवासही महागला असल्याचे चित्र आहे. मराठी महिन्यातील पाचवा महिना श्रावण असून सण, उत्सवांची सुरुवात करणारा आहे. हा महिना व्रतवैकल्याचा समजला जातो. त्यामुळे या दिवसांत उपवासाच्या पदार्थासह बिनाउपवासाच्या पदार्थांची रेलचेल असते. आपल्याकडे श्रावण महिन्यात अनेक जण उपवास करीत असल्याने उपवासाचे पदार्थ बनविण्यासाठी शेंगदाने, साबुदाना, भगर आदींची मागणी वाढत असते. त्यातच आता साबुदाणा, शेंगदाणाची आवक कमी झाल्याने शेंगदाणा, साबुदाण्यामध्ये साधारणत: किलोमागे पाच रुपयांची वाढ झाली आहे.
बॉक्स
आवक घटली, मागणी वाढली
साबुदाणा
साधारणत: ५५ते ६० रुपयांपासून साबुदाणा बाजारपेठेत उपलब्ध आहे. उपवासाचे दिवस सुरू झाल्याने मागील काही दिवसांपासून साबुदाण्याची मागणी वाढली आहे. ऐरवी इतर कार्यात साबुदाण्याला पाहिजे तशी मागणी नसते; मात्र श्रावण महिन्यात साबुदाण्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते.
------
शेगादाणा
बाजारपेठेत ९० रुपये किलोपासून १३० रुपयांपर्यंतच्या क्वालिटीचा शेंगदाणा उपलब्ध आहे; मात्र आता शेंगदाण्याची आवक कमी झाली आहे. याउलट मागणी वाढली आहे. शेंगदाण्याचे पीक निघायला काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे. गुजरात, आंधप्रदेश कर्नाटक, बिहार येथून शेगदाण्याची आवक होत असते; मात्र सध्या आवक कमी झाली आहे.
बॉक्स
भगरीचे दर स्थिर
श्रावणामध्ये उपवासाचे पदार्थ तयार करण्यासाठी भगरचा वापर करण्यात येतो; परंतु सध्यातरी भगरचे भाव स्थिर आहेत. बाजारपेठेत १०० ते १२० रुपये किलोच्या दराने भगरची विक्री सुरू आहे. श्रावणामुळे भगरची मागणी वाढली असल्याचे दिसून येत आहे.
बॉक्स
श्रावण महिना सुरू झाला आहे. पूर्वीच्या तुलनेत आता उपवासाचे रेडिमेट पदार्थ मिळतात. अनेकांकडून त्यांना पसंतीही मिळत असते. तरीसुद्धा शेंगदाणे, साबुदाणा आदींची मागणी वाढली असल्याचे दिसून येत आहे.
-सुरज वर्मा, व्यापारी.