शेतकऱ्यांना वाढीव दराने मोबदला

By Admin | Updated: March 31, 2016 01:26 IST2016-03-31T01:26:35+5:302016-03-31T01:26:35+5:30

दुर्गापूर डीप ओपनकास्ट एक्सटेन्शन प्रकल्पाकरिता जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया सुरु आहे.

The farmers were compensated at an increased rate | शेतकऱ्यांना वाढीव दराने मोबदला

शेतकऱ्यांना वाढीव दराने मोबदला

हंसराज अहीर : वेकोलि अधिकाऱ्यांना केल्या सूचना
चंद्रपूर : दुर्गापूर डीप ओपनकास्ट एक्सटेन्शन प्रकल्पाकरिता जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया सुरु आहे. यात सिनाळा, जुना मसाळा व नवेगाव या गावातील सुमारे ४१० हेक्टर जमिनीचे अधिग्रहण होत असल्याने या सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच वाढीव मोबदला व नोकऱ्या मिळण्याच्या दृष्टीने स्थानिक विश्रामगृहात ना. हंसराज अहीर यांनी वेकोलि अधिकाऱ्यांना पाचारण करुन त्यांना अनेक सूचना केल्या.
सदर बैठकीस वेकोलि चंद्रपूर क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक मिश्रा, नियोजन, कार्मिक तसेच सीएसआर विभागाच्या अधिकाऱ्यांसह भाजपा जिल्हासचिव राहुल सराफ, पंचायत समितीचे माजी सदस्य लोकचंद कापगते, सरपंच गीता वैद्य, उपसरपंच बंडू रायपुरे, पोलीस पाटील जीवनकला मांडवकर, तुकाराम तेलंग, किशोर मांडवकर, श्रीधर रोहनकर, नत्थू पेंदाम, संतोष वांढरे, निमसटकर व बहुसंख्य प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
केंद्रीय राज्यमंत्र्यांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या सक्सेशन सर्टीफिकेटला प्राधान्य देऊन याबाबतचा मार्ग मोकळा करावा, अशा सूचना क्षेत्रीय महाप्रबंधकास दिल्या. शासनाद्वारे सातबारावर नोंदी असलेल्या वारसांना ग्राह्य धरुनच पुढील प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच सिनाळा या गावाच्या अडचणी विचारात घेऊन पुनर्वसन कार्याला गती द्यावी. तसेच या प्रकल्पाच्या कॉम्प्लेक्सशन बिलात दुरुस्ती करुन प्रबंधननाने मुख्यालयास प्रस्ताव सादर करावे.
नोकरीचा विषय तातडीने मार्गी लागेल, या दृष्टीकोनातूनही कार्यवाही करावी, असे निर्देश वेकोलि अधिकाऱ्यांना दिले. क्षेत्रीय महाप्रबंधक मिश्रा यांनी मंत्रिमहोदयांनी केलेल्या सूचनांचे पालन करुन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल, अशी हमी हंसराज अहीर यांनी उपस्थित पदाधिकारी व प्रकल्पग्रस्तांना दिली. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The farmers were compensated at an increased rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.