बसमध्ये शेतकऱ्याचे पैशाचे पाकीट चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:19 IST2021-07-08T04:19:01+5:302021-07-08T04:19:01+5:30
प्राप्त माहितीनुसार, उमेश दादाजी कामडी रा. गडबोरी तालुका सिंदेवाही हे बाहेरगावी जाण्याकरिता सिंदेवाही येथून बसमध्ये चढत असताना त्यांना पाठीमागून ...

बसमध्ये शेतकऱ्याचे पैशाचे पाकीट चोरी
प्राप्त माहितीनुसार, उमेश दादाजी कामडी रा. गडबोरी तालुका सिंदेवाही हे बाहेरगावी जाण्याकरिता सिंदेवाही येथून बसमध्ये चढत असताना त्यांना पाठीमागून दोन जणांनी धक्काबुक्की केली. अशातच त्यांच्या पॅन्टच्या खिशातील पैशाचे पाकीट चोरीला गेले. यामध्ये ६ हजार ७०० रुपये होते. घटनेची माहिती होताच सिंदेवाही पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अवघ्या काही तासांमध्ये घटनास्थळावरून बसमध्ये बसून पसार झालेल्या दोन्ही आरोपींचा शोध घेऊन ताब्यात घेण्यात आले. आरोपींची कसून चौकशी केली असता चोरीच्या घटनेचा छडा लागला. ताजू मोहम्मद शेख (५२) रा. भानापेठ वार्ड, चंद्रपूर व पुरुषोत्तम जनार्दन देविकर रा. जोगी ठाणा, उमरेड जि. नागपूर अशी आरोपींची नावे आहेत. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार योगेश घारे, पीएसआय गोपीचंद नेरकर,पोलीस हवालदार देवानंद सोनुले,पोलीस शिपाई सतीश निनावे, राहुल रहाटे, मंगेश श्रीरामे, ज्ञानेश्वर ढोकळे यांनी केली आहे. फिर्यादी शेतकऱ्याचे पैसे सुखरूप मिळाल्यामुळे त्यांनी सिंदेवाही पोलिसांचे आभार मानून समाधान व्यक्त केले.