युरिया खताच्या टंचाईने शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 05:01 IST2020-07-17T05:00:00+5:302020-07-17T05:01:00+5:30

तालुक्याला वार्षिक १ हजार ६०० टन युरियाची आवश्यकता भासते. मागील वर्षीच्या हंगामात १ हजार ४३ टन युरियाचा वापर झाला होता. मात्र यावर्षी तालुक्यातील ठोक विक्रेत्यांना २८८ टन युरिया उपलब्ध झाला. आहे. त्यामुळे तालुक्यात युरियाची टंचाई निर्माण झाली आहे. सद्यस्थिती रोवणी सुरू असल्याने युरिया खतासाठी शेतकरी शोधाशोध करीत आहेत.

Farmers suffer from shortage of urea fertilizer | युरिया खताच्या टंचाईने शेतकरी त्रस्त

युरिया खताच्या टंचाईने शेतकरी त्रस्त

ठळक मुद्देतालुक्यात फक्त २२.०७ मेट्रीक टन साठा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : तालुक्यात युरिया खताची टंचाई निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सद्यस्थितीत सहा थोक विक्रेत्यांपैकी ४ विके्रत्यांकडे बुधवारी केवळ २२.०७ टन युरिया उपलब्ध असल्याची माहिती आहे.
तालुक्याला वार्षिक १ हजार ६०० टन युरियाची आवश्यकता भासते. मागील वर्षीच्या हंगामात १ हजार ४३ टन युरियाचा वापर झाला होता. मात्र यावर्षी तालुक्यातील ठोक विक्रेत्यांना २८८ टन युरिया उपलब्ध झाला. आहे. त्यामुळे तालुक्यात युरियाची टंचाई निर्माण झाली आहे. सद्यस्थिती रोवणी सुरू असल्याने युरिया खतासाठी शेतकरी शोधाशोध करीत आहेत.
तालुक्यात धानाचे पीक घेतले जाते. एकूण क्षेत्रफळापैकी जवळपास ३० हजार हेक्टर क्षेत्रात धान पीक घेतले जाते. २५ हजार हेक्टरमध्ये रोवणी तर ५ हजार हेक्टरमध्ये आवत्या टाकल्या जाते. धान पिकाला युरिया खताची आवश्यकता असते. मात्र नेमक्या याचवेळी बाजारात युरियाचा तुटवडा निर्माण झाला आहे. युरिया खत खरेदी करण्यासाठी शेतकरी कृषी केंद्रात जात आहेत. मात्र कृषी केंद्र संचालकांकडे उपलब्ध नसल्याने परत यावे लागत आहे. तालुक्यात सहा थोक विक्रेते आहेत. यामध्ये सेवा सहकारी सोसायटी तळोधी, पोशट्टीवार फर्टीलाझर्स तळोधी, आदिवासी विविध कार्यकारी सोसायटी गिरगाव, शरद कृषी केंद्र नागभीड, खरेदी व्रिकी संस्था नागभीड व विविध कार्यकारी सोसायटीचा समावेश आहे. या विक्रेत्यांकडून लहान विक्रेत्यांना वितरण केले जाते. मात्र थोक विक्रेत्यांकडेच युरिया उपलब्ध नाही. बुधवारपर्यंत सहा विक्रेत्यापैकी विविध कार्यकारी सोसायटीकडे १० मेट्रीक टन, पोशट्टीवार फर्टिलायझर ९.४५ टन, शरद कृषी केंद्र २.२५ टन युरियाचा साठा शिल्लक होता. अन्य तीन विक्रेत्यांकडे युरिया खत शिल्लक नसल्याची माहिती आहे.

Web Title: Farmers suffer from shortage of urea fertilizer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती