शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय करावा - अहीर
By Admin | Updated: July 9, 2017 00:49 IST2017-07-09T00:49:45+5:302017-07-09T00:49:45+5:30
दुधाला चांगली मागणी आहेत त्याच पद्धतीने दुधाचे भाव देखील वाढले आहेत. परराज्यातून दुधाची मागणी करावी लागत आहे.

शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय करावा - अहीर
आवारपूर : दुधाला चांगली मागणी आहेत त्याच पद्धतीने दुधाचे भाव देखील वाढले आहेत. परराज्यातून दुधाची मागणी करावी लागत आहे. शेतकऱ्यांनी सुद्धा दुग्ध पालन हा व्यवसाय करायला हवा.शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसायास प्राधान्य द्यावे, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले.
किसान कल्याण समिती व एका दूध डेअरीच्या संयुक्त विद्यमाने नांदा फाटा येथे दूध संकलन केंद्राच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे होते. तर भा.ज.पा शेतकरी आघाडीचे प्रमुख राजू घरोटे, प्रभाकर दिवे, माजी सभापती संजय मुसळे, पुरुषोत्तम निब्रड, ग्रामपंचायत नांदा चे उपसरपंच पुरुषोत्तम आस्वले, नोकरीचे सरपंच दशरथ नागतुरे, सदस्य खडसे, मेंढे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.
बिबी शेतकरी सदन शेतकरी ज्ञानेश्वर मोरे, माजी सैनिक छोटूलाल यादव यांचा सत्कार करण्यात आला. संचालन प्रा.प्रमोद वाघाडे तर आभार सतीश जमदाडे यांनी मानले.