शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:29 IST2021-01-25T04:29:08+5:302021-01-25T04:29:08+5:30
गोवरी : निसर्गाची अवकृपा, शासनाचे शेतकरीविरोधी धोरण, नापिकी, कर्जबाजारीपणा यामुळे शेतकरी होरपळला आहे. उत्पादनापेक्षा खर्च जास्त होत असल्याने शेतकरी ...

शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करावी
गोवरी : निसर्गाची अवकृपा, शासनाचे शेतकरीविरोधी धोरण, नापिकी, कर्जबाजारीपणा यामुळे शेतकरी होरपळला आहे. उत्पादनापेक्षा खर्च जास्त होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांनी शेतीवरील खर्च कमी करून आधुनिक पद्धतीने शेती करावी, असे प्रतिपादन अंबुजा सिमेंट फाऊंडेशनचे उत्पादक व्यवस्थापक विशाल भोगावार यांनी केले.
राजुरा तालुक्यातील पाचगाव येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पंचायत समिती सदस्य सुनंदा डोंगे, प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून स्वाती देशपांडे, देशकर, पोलीस पाटील, शंकर खामणकर उपस्थित होते. शेतकरी मेळाव्यासाठी शेतकऱ्यांनी कमी खर्चात शेती कशी करायची, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांनी स्वावलंबी होण्यासाठी व महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी माहिती दिली. तसेच महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंबुजा सिमेंट फाऊंडेशनचे प्रकल्प क्षेत्र अधिकारी गोपाल जंबुलवार, रुपेश गेडेकर, प्रदीप बोबडेे, साईनाथ पिंपळशेंडे, सीमा दुरवटकर,वाघाडे ,मंगला चांदेकर यांनी परिश्रम घेतले.