शेतकऱ्यांनी केली दोन एकरात मक्याची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:28 IST2021-04-02T04:28:44+5:302021-04-02T04:28:44+5:30
देवाडा बुज : दिवसेंदिवस ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे उत्पादन या ना त्या कारणाने घटले जात आहे. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती डबघाईस ...

शेतकऱ्यांनी केली दोन एकरात मक्याची लागवड
देवाडा बुज : दिवसेंदिवस ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे उत्पादन या ना त्या कारणाने घटले जात आहे. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती डबघाईस आली आहे. अशावेळी शेतकऱ्यांनी उन्हाळी दुबार पीक लावून थोडेफार उत्पन्न घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. येथील जगन्नाथ तुकाराम झरकर यांनी तर दोन एकरात मका लागवड करून पारंपरिक पिकाला फाटा दिला आहे.
यावर्षी वैनगंगा नदीला पुराचा प्रकोप झाल्याने शेतकऱ्याचे पीक जमीनदोस्त होऊन खरीप हंगामाला जोरदार फटका बसला होता. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला. अशा बिकट परिस्थितीत सामना करून घटलेले उत्पादन भरुन काढण्यासाठी पर्याय म्हणून मका पिकाची निवड करून शेतात लागवड केली आहे. मका बाजारात विक्रीसाठी ठेवला जाऊन नगदी पैसा येण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रगती निश्चितच उंचावेल. तालुका कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी सुद्धा या मका लागवडीची पाहणी करून शेतकऱ्याला कृषीविषयक सल्ला देऊन प्रोत्साहित करण्यात आले होते, हे विशेष.