शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

शेतकऱ्यांचे रबी हंगामातील नियोजन कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 5:00 AM

हजारो हेक्टरवरील धानपिकाचे नुकसान झाले. अशाही स्थितीत आता धान कापणी व बांधणीचे दर गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाच टक्क्याने वाढली आहेत. त्यामुळे शेतकरी हैराण झाले. त्यांचे नियोजन पूर्णत: कोलमडले आहे. जिल्ह्यातील ७० टक्के जनता धानपिकाच्या भरवशावर अवलंबून आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील अर्थव्यवस्था शेती व्यवसायावरच अवलंबून आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी व्यवसाय तोट्यात चालला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांवर आर्थिक संकट : कापणी व बांधणीसाठी तीन हजार रूपये एकर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : यंदाच्या खरीप हंगामात धानपीक ऐन गर्भवस्थेत असताना दिवाळीच्या पूर्वी ऑक्टोबर महिन्यात परतीच्या वादळी पावसाने जिल्ह्याला झोडपले. त्यामुळे हजारो हेक्टरवरील धानपिकाचे नुकसान झाले. अशाही स्थितीत आता धान कापणी व बांधणीचे दर गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाच टक्क्याने वाढली आहेत. त्यामुळे शेतकरी हैराण झाले. त्यांचे नियोजन पूर्णत: कोलमडले आहे.जिल्ह्यातील ७० टक्के जनता धानपिकाच्या भरवशावर अवलंबून आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील अर्थव्यवस्था शेती व्यवसायावरच अवलंबून आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी व्यवसाय तोट्यात चालला आहे. यावर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला. शेतकºयांनी जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक, सहकारी सोसायट्यांकडून कर्ज घेऊ न धानपीक लागवडीचा खर्च केला. धानपीक जोमात असताना परतीच्या पावसाने नुकसान केले. चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो शेतकरी धानपीक कापणी व बांधणीचे काम हाती घेतले आहे. दरम्यान, या कामाचे दर गतवर्षीपेक्षा यंदा वाढले. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांवर संकट ओढावल्याने आर्थिक परिस्थिती खिळखिळी झाली आहे. परंतु, अशाही स्थितीत कापणी बांधणीचे दर स्थित राहतील किंवा कमी होतील, असा अंदाज जिल्ह्यातील शेतकºयांना होता. परंतु सध्या उलट स्थिती निर्माण झाली. जिल्ह्यात धान कापणी व बांधणीसाठी प्रती एकर २ एकर ८०० रूपये गुत्ताच्या स्वरूपातून घेतले जात आहेत. काही ठिकाणी कापणी व बांधणीसाठी दीड हजार असे एकूण तीन हजार रूपये घेतले जात आहे. यंत्राच्या सहाय्याने धानाची मळणी केली जात असून प्रती पोते ५०, ५५ व ६० रूपये घेतले जात असल्याची माहिती शेतकºयांनी दिली.

टॅग्स :Farmerशेतकरी