शेतकऱ्यांनी जाणून घेतली आधुनिक शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 22:11 IST2018-06-01T22:10:57+5:302018-06-01T22:11:15+5:30

पडोली येथील सुशिलाबाई रामचंद्र मामीडवार कॉलेज आॅफ सोशल वर्कच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेच्या पुढाकाराने भद्रावती तालुक्यातील गोरजा गावाच्या स्वयंप्रेरणेतून पश्चिम महाराष्ट्रात अभ्यास दौरा नुकताच पार पडला़

Farmers learned modern farming | शेतकऱ्यांनी जाणून घेतली आधुनिक शेती

शेतकऱ्यांनी जाणून घेतली आधुनिक शेती

ठळक मुद्देअभ्यास दौरा : मामीडवार समाजकार्य महाविद्यालयाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पडोली येथील सुशिलाबाई रामचंद्र मामीडवार कॉलेज आॅफ सोशल वर्कच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेच्या पुढाकाराने भद्रावती तालुक्यातील गोरजा गावाच्या स्वयंप्रेरणेतून पश्चिम महाराष्ट्रात अभ्यास दौरा नुकताच पार पडला़ या दौऱ्यात शेतकऱ्यांनी आदर्श गाव, कृषी विद्यापीठ, सहकारी शेती, पाणलोट प्रकल्पांची पाहणी करून आधुनिक शेतीचे धडे घेतले़
प्राचार्य डॉ. सुनील साकुरे यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक तथा रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. सुभाष गिरडे, सहसमन्वयक प्रा. किरणकुमार मनुरे यांनी जबाबदारी स्वीकारली होती़ अभ्यास दौऱ्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील शेती, बचत गटातील पुरुष, महिला, युवक, छत्रपती शिवाजी महाराज पाणी वाटप संस्था गोरजा, अध्यक्ष सचिव, ग्रामपंचायत सदस्य, सहकारी संस्थांची माहिती शेतकऱ्यांनी जाणून घेतली़
राळेगाव सिद्धी, आदर्श गाव पाटोदा, सहकारी शेती करणारी इंगेगाव, जिल्हा परळी, परभणी कृषी विद्यापीठ व राहुरी कृषी विद्यापीठांना भेट दिली़ ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन विकासाच्या विविध प्रकल्पांची माहिती घेतली़ गावाच्या हितासाठी कोणत्या गोष्टींची गरज आहे, यावर शेतकºयांनी संवाद साधला़ राळेगाव सिद्धी गावाची माहिती घेतल्यानंतर अण्णांच्या भेटीसाठी आतुर असणारे व त्यांचे मार्गदर्शन लाभेल की नाही यावर सर्वांचा प्रश्न होता. कारण अण्णांची प्रकृती बरोबर नसल्यामुळे ते भेटणार नाही, असे वाटले होते. पण चंद्रपूर जिल्ह्यातून आदर्श गाव संकल्पनेतून स्वयंप्रेरणा घेवून शेतकरी आल्याचे कळताच अण्णांनी भेटीचा वेळ दिला़ शेतकरी व महिलांशी दिलखुलास चर्चा केली़ शेतीकरिता पाण्याचा योग्य वापर करावा़ महिलांनी संघटित होवून व्यसनमुक्त गाव, नियमित ग्रामसभा तसेच शुद्ध आचारविचार, शुद्ध चरित्र, त्यागावर आधारित जीवन जगण्याचा प्रयत्न करावा़, असे मत अण्णा हजारे यांनी चर्चेदरम्यान व्यक्त केले़ स्वत:सोबतच गावाचा विचार करुन जात व धर्मभाव न पाळता एकत्र यावे, असा मुलमंत्र जिल्ह्यातील शेतकºयांना दिला़ गावाच्या विकासाकरिता हा अभ्यास दौरा प्रेरणादायी असून शेती आणि गावात विविध प्रकल्प राबविताना अंमलात आणू, असा संकल्प शेतकºयांनी केला़

Web Title: Farmers learned modern farming