बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:18 IST2021-07-19T04:18:54+5:302021-07-19T04:18:54+5:30
सावली : सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या व्याहाड खुर्द उपवन क्षेत्रातील सामदा बिटात दबा धरून बसलेल्या बिबट्याने शेतात जाणाऱ्या ...

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी
सावली : सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या व्याहाड खुर्द उपवन क्षेत्रातील सामदा बिटात दबा धरून बसलेल्या बिबट्याने शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यावर हल्ला करून जखमी केले. ही घटना रविवारी सकाळच्या सुमारास घडली. विठ्ठल उसटू गेडाम (६०) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे.
सावली वनपरिक्षेत्रात दिवसेंदिवस वन्यप्राण्यांच्या हल्ल्याचे प्रमाण वाढत आहे. यात व्याहाड खुर्द उपवनक्षेत्र अंतर्गत व्याहाड बुज येथे बिबट्याने रात्रीच्या सुमारास घरात घुसून महिलेला ठार केले होते. या घटनेला आठवडा लोटला नसेल तोच सामदा येथील शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला चढवून जखमी केल्याची घटना घडली. हा शेतकरी आपल्या शेतात जात असताना अचानक बिबट्याने हल्ला केला. हातामध्ये काठी असल्याने त्या काठीच्या सहाय्याने बिबट्याला पळवून लावण्यात शेतकरी यशस्वी झाल्याने मोठा अनर्थ टळला. जखमी शेतकऱ्यास प्राथमिक उपचाराकरिता सावली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले व पुढील उपचाराकरिता गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
180721\img-20210718-wa0136.jpg
बीबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेला ईसम.