शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

कापूस उत्पादन घटल्याने शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2019 12:38 AM

तालुक्यातील कृषी क्षेत्र कोरडवाहू आहे. निसर्गाच्या जलचक्रावर शेती उत्पादन अवलंबून आहे. निसर्गाचा लहरीपणा शेतकºयांच्या जीवावर उठला आहे. यामुळेच बळीराजा दिवसेंदिवस हवालदिल होत आहे. याला कारणीभुत शेती उत्पादनातील घट आहे.

ठळक मुद्देआर्थिक बोजा वाढला : शेतकऱ्यांसमोर कर्ज फेडण्याचे संकट

अनेकश्वर मेश्राम ।लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : तालुक्यातील कृषी क्षेत्र कोरडवाहू आहे. निसर्गाच्या जलचक्रावर शेती उत्पादन अवलंबून आहे. निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे. यामुळेच बळीराजा दिवसेंदिवस हवालदिल होत आहे. याला कारणीभुत शेती उत्पादनातील घट आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कापसाने शेतकऱ्यांना चांगलाच दगा दिला आहे. कापसाचे उत्पादन निम्म्यावर आल्याने शेतकरी अडचणीत सापडल्याने वास्तव बल्लारपूर तालुक्यात दिसून येत आहे.खरीपाच्या हंगामासाठी तालुक्यात सात हजार ६७९ हेक्टर कृषी क्षेत्र निर्धारित करण्यात आहे. यावर्षी पावसाने सरासरी ओलांडली असली तरी पडणाºया पावसाने खंड पाडल्याने शेती उत्पादनावर विपरीत परिणाम झाला. तालुक्यातील भात व कापूस प्रमुख पीक आहेत. एकूण सात हजार ५०५.६० हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी कापसाची तर दोन हजार ९८६.४० हेक्टर क्षेत्रात भाताचे लागवड केली. मात्र, कापसाने यावर्षी बळीराजाला जबर फटका दिला. गतवर्षीच्या तुलनेत निम्मेच उत्पादन झाले. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. वर्षभराच्या उदरनिर्वाहाची चिंता बळराजाला सतावत आहे.ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था कृषी व्यवसायावर अवलंबून आहे. शेतकरी, शेतमजूर यावरच वर्षभराच्या उदरनिर्वाहाची तजवीज करतात. परंतु शेती मालाचे उत्पादन घटल्याने बळीराजाचे अवसान गळाले आहे. शेतीची मशागत करूनही उत्पादनात वाढ झाली होत नसल्याने हवालदील झाला आहे. कृषी क्षेत्रातील एकूण पीक पेरणी क्षेत्रापैकी तालुक्यातील शेतकऱ्यांनी तीन हजार ८८५.५० क्षेत्रात कापूस १०७ हेक्टर क्षेत्रामध्ये भाजीपाली, ४९६.८० हेक्टरमध्ये तूर, दोन हजार ९८६.४० हेक्टरमध्ये भात तर केवळ १२८.४० हेक्टर सोयाबिन पिकांची लागवड केली. परंतु पर्जन्यमानाचा खंड पडल्यामुळे कापसाच्या उत्पादनावर परिणाम झाला.अशातच बोंडअळीच्या आक्रमणाचे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. कापूस उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. यामुळेच त्यांना भवितव्याची चिंता सतावत आहे. उचल केल्याच्या कर्जाची परतफेड कशी करावी. कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्र समोर आला आहे. यातून बळीराजाला सावरण्यासाठी दिलासा देण्यासाठी शासनस्तरावर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :cottonकापूस