शेतकऱ्यांनी घेतले ८० एकरात तुरीचे पीक

By Admin | Updated: October 30, 2016 00:42 IST2016-10-30T00:42:37+5:302016-10-30T00:42:37+5:30

स्वत:ची तीन एकर जमीन आहे त्या जमिनीतील पिकावर विसंबून राहण्याचे नाही.

The farmers harvested 80 acres of turmeric | शेतकऱ्यांनी घेतले ८० एकरात तुरीचे पीक

शेतकऱ्यांनी घेतले ८० एकरात तुरीचे पीक

वरोरा : स्वत:ची तीन एकर जमीन आहे त्या जमिनीतील पिकावर विसंबून राहण्याचे नाही. त्यातच शेतीत नवीन नवीने पिकांचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या त्याच शेतकऱ्याने ८० एकर किरायाने शेती घेवून ८० एकरामध्ये संपूर्णपणे तुरीचे पीक घेत आहे. या तुरीच्या पिकात आंतरपिक मुंग घेवून शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवला आहे.
सध्या संपूर्ण शेतकरी सोयाबिन व कपाशीच्या पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळले आहे. कपाशीच्या मशागतीला मोठ्या प्रमाणात खर्च आहे. त्यातच दरही कपाशीला मिळत नाही त्यामुळे कपाशीचे पिक परवडत नाही अशी ओरड सातत्याने शेतकरी करीीत असतात. परंतु कपाशीची लागवड करणे सोडत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कर्जबाजारी सात्याने होत असल्याने निराश झालेले शेतकरी आत्महत्या करीत असल्याचा निर्ष्कष काढल्या जात आहे असे असताना वरोरा तालुक्यातील चारगाव (बु.) येथील अल्पभूधारक शेतकरी मधूकर भरलमे यांच्याकडे स्वत:ची तीन एकर शेती आहे. या शेतात ते नेहमी वेगवेगळ्या पिकाचे प्रयोग करीत विक्रमी उत्पादन घेत असतात तीन एकर स्वत:ची शेती असताना मधूकर भलमे यांनी ८० एकर शेती किरायाने घेतली या किरायाच्या शेतात तूर पिक घेणे सुरु केले. तूरपीकाची पेरणी मशागत संपूर्ण टॅक्ट्रच्या सहाय्याने करीत असतात ट्रॅक्टरनी मशागत पूर्ण झाल्यानंतर तूर पिकाच्या मधील जागेत त्यांनी मुंगाचे आंतरपिक घेतले आहे. सध्या त्यांच्या शेतातील तुरीचे पिक चांगले असून एका एकरात वीस ते पंचेवीस क्विंटल तुरीचे पिक होईल असा आशवाद मधुकर भलमे यांनी व्यक्त केला असून सध्या तुरीला दरही अधिक असल्याने मोठा फायदा होणार आहे.
हा प्रयोग इतर शेतकऱ्यांनी केल्यास तेसुद्धा आर्थिक कोंडीतून मुक्त होईल अशा विश्वास व्यक्त केला जात आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The farmers harvested 80 acres of turmeric

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.