Farmers' grinding machine will get 5 liters of diesel | शेतकऱ्यांच्या मळणी यंत्राला मिळणार २५ लिटर डिझेल

शेतकऱ्यांच्या मळणी यंत्राला मिळणार २५ लिटर डिझेल

ठळक मुद्देसंडे अ‍ँकर। सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
सास्ती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या संचारबंदीमुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. शेतमालाची मळणी करण्यासाठी डिझेल मिळणे बंद झाले. दरम्यान, शेतकºयांची ही अडचण दूर करण्यासाठी राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे मदतीला धावून आले. यापुढे प्रत्येक मळणी यंत्रणाला २५ लिटर पेट्राल पंपावरून डिझेल विकत घेता येणार आहे.

राजुरा तालुक्यातील शेकडो शेतकºयांचे पीक शेतातच पडून आहेत. शेतकºयांनी हा प्रश्न माजी आमदार सुदर्शन निमकर, भाजपचे नेते संजय उपगन्लावर, विनायक देशमुख यांच्याकडे समस्या मांडली. त्यानंतर शिष्टमंडळाने आमदार सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन शेतकºयांना मळणीकरिता मळणी यंत्राला पेट्रोलपंपातून डिझेल मिळवून देण्याची मागणी केली.
शेतकºयांच्या निकडीचा प्रश्न लक्षात घेवून आमदार मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्यासोबत बैठक घेऊन मळणी यंत्राकरिता २५ लिटर डिझेल देण्यासंदर्भात चर्चा केली. त्यामुळे शेतकºयांच्या मळणी यंत्रणाकरिता पेट्रोलपंपधारकांनी २५ लिटर डिझेल देण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी जारी केले.

मळणीअभावी पिके शेतातच
कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने कापून ठेवलेला गहू, हरभरा, मूग, जवस व अन्य पिके मळणीअभावी शेतातच अडकली आहेत. मळणी यंत्रांसाठी डिझेल मिळण्याचा मार्ग बंद झाला. काही गावांमध्ये यंत्र असूनही पोलिसांच्या धास्तीमुळे मळणीचालक शेतात येण्यास तयार नाही. शेतमाल काढण्यासाठी मजूर मिळत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

रेशनकार्ड नसले तरी धान्य
जागतिक महामारीच्या संकटाचा सामना करत असताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रेशनकार्डावर तीन महिन्याचे धान्य मोफत देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र, अनेक ठिकाणी रेशनकार्ड नसणारे कामगार आहेत. धान्य मिळणार की नाही, अशी शंका व्यक्त केली जात आहे. परंतु, याबाबत जिल्हाधिकाºयांशी चर्चा झाली असून रेशनकार्ड नसले तरीही यादी करून धान्य पुरवठा करण्याच्या सूचन प्रशासनाकडून तहसीलदारांना देण्यात आल्या. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपल्या भागामध्ये रेशनकार्ड नसणाºयांची यादी तयार करून तहसीलदारांना पाठवावी. यादीची प्रत माझ्या अथवा अजय धवने यांच्या व्हॉटस्अपवर पाठविल्यास कुटुंबांना मदत करणे व त्याचे योग्य नियोजन करणे सोईचे होईल, अशी माहिती राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

स्थानिक विकास निधीतून निधी खर्च करण्याची परवानगी द्यावी
जिल्ह्यात विविध उपाययोजना जिल्हा प्रशासन तसेच आरोग्य विभागाच्या माध्यमातून सुरू आहे. लोकप्रतिनिधी म्हणून योगदान असावे, या भावनेतून माझ्या स्थानिक विकास निधीतून एक कोटी रुपये निधी जिल्हा प्रशासनाला औषधी तसेच अन्य आरोग्य विषयक उपाययोजनांसाठी देण्याचा माझा मानस आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रातही, औषधी, सॅनिटायझर, मास्क आदींसाठी हा निधी खर्च करता येईल, यासाठी आपण विशेष बाब म्हणून मला अनुमती द्यावी व या संदर्भात जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना प्रदान करावे, अशी मागणी माजी अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी राज्याचे प्रधान सचिवांकडे केली आहे.

Web Title: Farmers' grinding machine will get 5 liters of diesel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.