वरोरा येथे शेतकऱ्यांचा मोर्चा
By Admin | Updated: December 6, 2014 01:23 IST2014-12-06T01:23:02+5:302014-12-06T01:23:02+5:30
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी वरोरा, भद्रावती तालुका, शहर युवक व महिला काँग्रेसच्या वतीने एसडीओ कार्यालयावर....

वरोरा येथे शेतकऱ्यांचा मोर्चा
वरोरा : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी वरोरा, भद्रावती तालुका, शहर युवक व महिला काँग्रेसच्या वतीने एसडीओ कार्यालयावर डॉ. विजय देवतळे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला. वरोरा येथील आंबेडकर चौक येथून सुरु झालेल्या मोर्चात वरोरा व भद्रावती तालुक्याच्या ग्रामीण भागातील शेतकरी बांधव व युवक वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कापसाला ७ हजार रुपये तर सोयाबीनला ४ हजार रुपये प्रती क्विंटल भाव द्यावा, तसेच २५ हजार रुपये हेक्टर ओलिताच्या शेतीकरिता व ५० हजार रुपये हेक्टर अनुदान कोरडवाहू शेतीला देण्याच्या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी लोंदे यांना देण्यात आले.
आंबेडकर चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मार्ल्यापन करून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री बॅ. अब्दुल रहमान अंतुले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर सभेला लक्ष्मण गमे, छोटुभाई शेख, जिवतोडे व डॉ. विजय देवतळे यांनी मार्गदर्शन उपस्थिांना मार्गदर्शन केले. त्यानंतर मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात भोजराज झाडे, साहेबराव ठाकरे, विलास टिपले, छोटुभाई गमे, सुनंदा जिवतोडे, गजानन चांदेकर, अनिल चौधरी, शेखर, नक्षिणे, सुभानभाई, पुरुषोत्तम निखाडे, शेखर रंगारी, सुधाकर आत्राम, अनिल चौधरी, सुमीत मुडेवार, दिलीप मांढरे, दिलीप ठंगे, देवराव ठमके, वसंत विधाते, चरण मोडक, गिरधर कष्टी, सोमदेव कोहाड, विजय पिसके, संजय महाजन, गुणवंत भोयर, मदिना शेख, विमल श्रीरामे, सोरते यांच्यासह परिसरातील शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते. (तालुका प्रतिनिधी)