शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
2
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
3
"अल्पसंख्याकांवरील अत्याचार खपवून घेणार नाही" २,९०० हून अधिक हल्ल्यांचा पुरावा; भारताचा बांगलादेशला गंभीर इशारा
4
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
5
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
6
"इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
7
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
8
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
9
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
10
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
11
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
12
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
13
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
14
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
15
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
16
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
17
MNS: गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
18
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
19
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
20
बापरे! हिवाळ्यात 'या' छोट्या चुकांमुळे वेगाने गळू लागतात केस, टक्कल पडण्याची वाटते भीती
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीच्या मालकी हक्कांसाठी शेतकऱ्याची फरफट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 00:21 IST

महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील १४ गावांतील नागरिकांना महाराष्ट्र सरकारकडून जमिनीचा सातबारा देण्यात आला.

ठळक मुद्दे१४ गावांची व्यथा : महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील गावे शासकीय योजनांपासून वंचित

आॅनलाईन लोकमतजीवती : महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील १४ गावांतील नागरिकांना महाराष्ट्र सरकारकडून जमिनीचा सातबारा देण्यात आला. पण त्यावर जमीन कसणाऱ्याचे नाव आणि मालकी हक्काची नोंद केली नाही. त्यामुळे शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहण्याची वेळ शेकडो शेतकऱ्यांवर आली आहे. पाठपुरावा करूनही राज्य शासनाने दखल न घेतल्याने आजही फरपट सुरूच असल्याचे दिसून येते.जीवती तालुक्याच्या शेवटच्या टोकावर वस्ती करून जीवन जगणाऱ्या मुकादमगुडा, परमडोली, तांडा, कोटा (बु), लेंडीजाळा, महाराजगुडा, शंकरलोधी, पद्मावती, अंतापूर, इंदिरानगर, येसापूर, पळसगुडा, भोलापठार, लेंडीगुडा या गावांतील शेकडो शेतकºयांना १४ फेब्रुवारी १९९६ मध्ये जमिनीचा सातबारा देण्यात आला आहे. पण, त्यातील भोगवटदार रकान्यात ‘सरकार’ अशी नोंद करण्यात आली आहे. शिवाय, नमूना वाटामध्ये केवळ जमीन कसणाºयाचे नाव आहे. भोगवटदार रकान्यात ‘सरकार’ अशी नोंद असल्यामुळे ती जमीन शेतकºयांची नसून कायद्यानुसार सरकारची मानली जाते. त्यामुळे या सातबाराचा १४ गावांतील शेतकºयांना शेतीच्या विकासासाठी कुठलाही फायदा घेता नाही. शेतकºयांना शेतीविषयक दस्ताऐवज देण्यास संबंधित तलाठी नकार देतात.१९६२-६३ पासून वास्तव्यास असलेल्या येथील शेतकरी मराठी भाषिक आहेत. १९९५ पासून चंद्रपूर लोकसभा आणि राजुरा विधानसभेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावत आहेत. विशेष म्हणजे, आंध्र प्रदेशातील सार्वत्रिक निवडणुकांवर सहाव्यांदा बहिष्कार टाकला होता. मात्र, महाराष्ट्र सरकार या उपेक्षित १४ गावांना आपले मानून न्याय देण्यास तयार नाही. त्यामुळे आम्ही नेमके कोणत्या राज्यात आहोत, असा संतप्त प्रश्न अन्यायग्रस्त शेतकºयांनी केला आहे.इच्छाशक्ती हवीमहाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांमध्ये अडकलेल्या १४ गावांचा वाद सर्वोच्च न्यायालयाने निकाली काढला. १७ जुलै १९९७ ला दिलेल्या आदेशानुसार ही गावे महाराष्ट्र राज्याच्या ताब्यात आली आहेत. त्यामुळे सरकारने तेथील सर्व जनतेला संविधानाच्या तरतुदीनुसार सर्व प्रकारच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे. परंतु, लोकप्रतिनिधींची इच्छाशक्ती कमी पडत असल्याने या गावांवर अन्यायाची मालिका सुरू आहे.सांत्वनेला अर्थ नाहीनिवडणुकीपूर्वी गावात भेट देऊन शेतकऱ्यांची समस्या जाणून घेतली जाते. मात्र, निकाल घोषित होताच पाच वर्षे कुणीही व्यथा समजून घेत नाही. नेत्यांकडून केवळ निवडणुकीच्या हंगामातच कोरडी सांत्वना मिळते. हा प्रकार मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे खोटी आश्वासने न देता जमिनीचा भूमिअभिलेख तयार करून सर्व शेतकऱ्यांना मालकी हक्काचे पट्टे द्यावी.- रामदास रणविर, सामाजिक कार्यकर्ते मुकादमगुडा