पैसेवारीने केला शेतकऱ्यांचा घात

By Admin | Updated: October 17, 2015 01:33 IST2015-10-17T01:33:16+5:302015-10-17T01:33:16+5:30

राज्य सरकारने अलीकडेच घोषित केलेल्या आणेवारीने चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा घात केला आहे.

Farmers' execution by the paralysis | पैसेवारीने केला शेतकऱ्यांचा घात

पैसेवारीने केला शेतकऱ्यांचा घात

सरकारच्या मते जिल्ह्यात सुकाळ : सर्व गावांची पैसेवारी ५० टक्क्यांवर
चंद्रपूर : राज्य सरकारने अलीकडेच घोषित केलेल्या आणेवारीने चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा घात केला आहे. जिल्ह्यातील सर्व गावांची पैसेवारी ५० टक्क्यांवर असल्याने एकाही गावाचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश झालेला नाही. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी वर्गात कमलीची नाराजी व्यक्त होत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात धान आणि कापसाचे मुख्य पीक आहे. यंदा अगदी अत्यल्प पाऊस पडल्याने धानाचे पीक वाया गेले आहे. अनेक ठिकाणी धान पाण्याअभावी सुकल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. कापसाच्या बाबतीही असेच आहे. पिकावर लाल्या रोग आल्याने कपाशी वाया गेली आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर असताना जिल्ह्यात दमदार पाऊस झाला होता. त्याचा आधार मिळाल्याने पिके काही प्रमाणात तरली असली तरी अनेक गावांमध्ये पिकांची स्थिती बिकट आहे.
जिल्ह्यात मूल, सावली, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, नागभीड, चिमूर, चंद्रपूर हे तालुके धान पिकात अव्वल आहेत. अन्य ठिकाणी कापूस, सोयाबिनचे उत्पन्न शेतकरी घेतात. मात्र या वर्षी सर्वच ठिकाणी पिके अडचणीत आहेत. प्रकल्पात पाणीसाठा अपुरा असल्याने शेतीसाठी पाणी सोडताना तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. परिणामत: भविष्यात शेतकरी विरूद्ध प्रशासन अशी संघर्षाची स्ष्ट चिन्हे दिसत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Farmers' execution by the paralysis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.