धानाच्या उतारीने शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 05:00 AM2020-11-07T05:00:00+5:302020-11-07T05:00:19+5:30

नागभीड तालुक्यात धान पिकाची कापणी आता अंतिम टप्प्यात आहे. पुढील आठ दिवसांत या धान पिकाची पूर्णपणे कापणी होणार आहे. मात्र अशातच मावा, तुडतुडा, करपा यासारख्या विविध रोगांनी या पिकावर आक्रमण केल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत. काही शेतकऱ्यांनी दोनदा तीनदा औषधांच्या फवारणी करूनही हे रोग आटोक्यात येत नसल्याच्या तक्रारी आहेत. या रोगांच्या भीतीने काही शेतकरी धानाची मुदतपूर्वच कापणी केली आहे.

Farmers' dreams shattered by the unloading of grain | धानाच्या उतारीने शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा

धानाच्या उतारीने शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा

Next
ठळक मुद्देसरासरीच्या ३० टक्केच उतारी

घनश्याम नवघडे
    लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : अगोदर परतीच्या पावसाने आणि नंतर विविध रोगांचे धान पिकावर आक्रमण याचा परिणाम धान पिकाच्या उतारीवर झाला आहे. हातात येत असलेली उतारी पाहून शेतकऱ्यांचे स्वप्न पार चुराडा होत आहे. सरासरीच्या ३० टक्केच उतारी येत असल्याने शेतकऱ्यांसमोर ऐन दिवाळीत आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे. 
नागभीड तालुक्यात धान पिकाची कापणी आता अंतिम टप्प्यात आहे. पुढील आठ दिवसांत या धान पिकाची पूर्णपणे कापणी होणार आहे. मात्र अशातच मावा, तुडतुडा, करपा यासारख्या विविध रोगांनी या पिकावर आक्रमण केल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत. काही शेतकऱ्यांनी दोनदा तीनदा औषधांच्या फवारणी करूनही हे रोग आटोक्यात येत नसल्याच्या तक्रारी आहेत. या रोगांच्या भीतीने काही शेतकरी धानाची मुदतपूर्वच कापणी केली आहे. धानाची कापणी झालेल्या शेतकऱ्यांनी मळणीस सुरूवात केली असून धानाची उतारी पाहून शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकायला लागली आहे. 
सर्वसामान्यपणे एका एकरातून किमान १७ ते २० पोती धानाची उतारी यायला पाहिजे. पण यावर्षी ८ ते ९ पोतीच उतारी येत आसल्याचे शेतकरी सांगत आहेत. काही शेतकऱ्यांना तर यापेक्षा कमी उतारी येत आहे. धान कापणी, बांधणी आणि मळणीस परवडत नाही म्हणून काही शेतकरी धानाची कापणीच न करण्याचा विचार करीत आहेत. या संकटाने तालुक्यातील शेतकरी खचले आहेत. आवते, पऱ्हे भरण्यापासून तर रोवणी, निंदण, कापणी, बांधणी आणि मळणी करेपर्यंत शेतकऱ्यांना दर एकरी १४ ते १५ हजार रुपये खर्च येत असल्याची माहिती आहे. अशी आपत्ती ओढवली तर शेतकऱ्यांनी करावे काय, हा प्रश्न निर्माण झाला आहे. आज कोणीही शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम राहिला नाही. शेतीचा हंगाम करताना एकतर शासकीय नाही तर खासगी कर्जाची उचल करूनच शेती करावी लागते. आता उचल केलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी आणि घरी काय ठेवावे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. तालुक्यात एकूण ३० हजार हेक्टर क्षेत्रात धानाची लागवड केली जाते. यावर तालुक्याची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. 

मळणीयंत्र मालक बेजार
धानाची उतारी लक्षात घेता धानाची मळणी करणारे मशीन मालक चांगलेच वैतागले आहेत. कापणी केलेल्या धानाचे पुंजणे मोठे दिसत असल्या तरी त्यातून निघणारी धानाची पोती अतिशय कमी राहत आहेत. त्यामुळे मशीन आणि मजुरांनाही परवडत नाही. त्यामुळे अनेक मशीन मालकांनी आता पोत्याच्या संख्येनुसार मोबदला घेण्याऐवजी डिबली किंवा एकराच्या हिशेबानुसार मोबदला घेणे सुरू केले असल्याची माहिती आहे.

 

Web Title: Farmers' dreams shattered by the unloading of grain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.