शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनला भाव मिळाला तरच शेतकऱ्यांची दिवाळी गोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2022 22:43 IST

गतवर्षी सोयाबीनला दहा हजारांपर्यंत भाव मिळाला होता. नंतर कमी होऊन तो पहिले आठ व नंतर सहा हजार रुपयांवर स्थिरावला होता. मात्र सोयाबीनचा हंगाम सुरू होताच दरात घसरण सुरू झाल्याने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी अडचणीत आले आहे. त्यामुळे शेतमालाच्या भाव वाढवण्याची मागणी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : सोयाबीनच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. नवे सोयाबीन बाजारात येताच व्यापाऱ्यांनी भाव पाडले आहे. क्विंटलमागे हजार रुपयांची घसरण झाली आहे. मागील महिन्यात पाच ते सहा हजारांवर असलेला सोयाबीनचा भाव आता चार ते साडेचार हजारांवर आलेला आहे. त्यामुळे सोयाबीनची दरवाढ झाल्यास शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. अन्यथा यंदा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.यंदा दोन-अडीच महिन्यांपासून सतत पाऊस सुरू आहे. किमान दीड ते दोन लाख हेक्टरवील सोयाबीनचे नुकसान झाल्याने उत्पादनात कमी येणार आहे. काढणीच्या हंगामातही मध्ये-मध्ये पाऊस सुरू आहे. सोयाबीनच्या गंज्या पावसाने भिजत आहेत. गतवर्षी सोयाबीनला दहा हजारांपर्यंत भाव मिळाला होता. नंतर कमी होऊन तो पहिले आठ व नंतर सहा हजार रुपयांवर स्थिरावला होता. मात्र सोयाबीनचा हंगाम सुरू होताच दरात घसरण सुरू झाल्याने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी अडचणीत आले आहे. त्यामुळे शेतमालाच्या भाव वाढवण्याची मागणी होत आहे.

सोयाबीनवर केलेला खर्चही निघेनायंदा पावसाने वेळी अवेळी हजेरी लावली. त्यामुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला. उताराही कमी झाला आहे. सोयाबीन वरील खर्चही निघणार की नाही,अशी भीती आहे.

मूग, उडदाची आवक निरंकजिल्ह्यातील मूग व उडदाचे पीक उशिराच्या पावसाअभावी बाद झाले आहे. यामध्ये जे पीक बचावले,ते अतिवृष्टीमुळे खराब झाले असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये मूग व उडदाची आवक निरंक असल्याचे दिसून येते.

पावसामुळे सोयाबीनचे भाव घसरलेनव्या सोयाबीनमध्ये अधिक आर्द्रता असल्याने दरात कमी आलेली आहे. जुन्या सोयाबीनचे दर मात्र पाच हजारांच्यावर आहे. याशिवाय पावसाने भिजलेले सोयाबीनचे दर २२०० पासून सुरू आहेत.

शेतकऱ्यांची दिवाळी अडचणीतजेव्हा शेतकऱ्यांच्या हातात पीक येते. तेव्हा नेहमीच दर कमी केले जातात. त्यामुळे दरवर्षीच शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागतो. किमान आठ हजारांच्या वर भाव देणे गरजेचे आहे.   - सखाराम सोनुले, शेतकरी

दरवर्षीच शेतकऱ्यांना अस्मानी व सुलतानी संकटांना सामोर जावे लागते. परंतु, शासनाकडून हवा तेवढा भाव कधीच शेतकऱ्यांना दिला जात नाही. त्यामुळे ते नेहमीच कर्जबाजारी असतात.                       - पवन मडावी, शेतकरी

 

टॅग्स :FarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्ड