हस्त नक्षत्रातील पावसाने जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 05:00 IST2019-10-01T05:00:00+5:302019-10-01T05:00:54+5:30

गत काही वर्षाचा शेतकऱ्यांचा अनुभव बघता दरवर्षी पावसाची प्रतिक्षा करावी लागते. यावर्षीही सुरूवातीला पावसाने दडी मारली होती. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीपासून दररोज पाऊ स कोसळत आहे. कोसळलेल्या या पावसाने वार्षिक सरासरी गाठली आहे. अनेक गावात पुर परिस्थती निर्माण झाली. भात पिकांच्या बांध्यामध्ये पाणी साचल्याने पिक सडण्याची भिती निर्माण झाली.

Farmers in the district worried by the rains | हस्त नक्षत्रातील पावसाने जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत

हस्त नक्षत्रातील पावसाने जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत

ठळक मुद्देवरूणराजा आता तरी थांब : भात पिकासह भाजीपाला पिकांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील महिनाभरापासून सतत सुरू असलेल्या पावसाने सर्वसामान्यच नाही, तर शेतकरी सुध्दा आता पुरते कंटाळले आहेत. वरूण राजा आतातरी थांब, अशी आर्त विणवणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून उत्तरासह हस्त नक्षत्रातील जोरदार पावसामुळे भातपिकासह भाजीपाला पिक धोक्यात आले आहे.
गत काही वर्षाचा शेतकऱ्यांचा अनुभव बघता दरवर्षी पावसाची प्रतिक्षा करावी लागते. यावर्षीही सुरूवातीला पावसाने दडी मारली होती. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीपासून दररोज पाऊ स कोसळत आहे. कोसळलेल्या या पावसाने वार्षिक सरासरी गाठली आहे. अनेक गावात पुर परिस्थती निर्माण झाली. भात पिकांच्या बांध्यामध्ये पाणी साचल्याने पिक सडण्याची भिती निर्माण झाली. नदी, नाल्यांच्या तिरावरील शेतशिवाराला पुराचा फटका बसला. यामुळे शेतकरी आता धास्तावले आहे. महिन्याभरात असा एकही दिवस गेला नाही की, पाऊ स आला नाही. शनिवार, रविवार तसेच सोमवारी रात्री शहरासह जिल्ह्यात वादळी पावसाने हजेरी लावली. हस्त नक्षत्रातील पावसात प्रचंड विजेचा कडकडाटही सुरु होता.

रोगांचा प्रादूर्भाव
चंद्रपूर : वातावरणातील बदल, दमटपणा व अतिवृष्टीमुळे यावर्षी खरीप हंगामात धानपिकावर लष्करी अळीसह विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. जिल्ह्यात शेकडो हेक्टर शेतातील धानपिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांनी दोन ते तीन वेळा कीटनाशकाची फवारणी केली आहे. मात्र रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. अद्यापही पावसाचा जोर कायम आहे. दमट वातावरणामुळे तथा अतिवृष्टीमुळे धानपिकावर लष्करी अळी या रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. याशिवाय खोडकीडा, करपा, कडाकरपा व इतर रोगांचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.

दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
जिल्ह्यात अतिवृष्टीचे सावट आहे. मात्र अद्यापही कृषी विभागाने सर्वेक्षण केले नसल्याची ओरड शेतकऱ्यांची असून जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दमट वातावरणामुळे तथा अतिवृष्टीमुळे धानपिकावर लष्करी अळी या रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. याशिवाय खोडकीडा, करपा, कडाकरपा व इतर रोगांचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.

Web Title: Farmers in the district worried by the rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती